Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
२३ माजी नगरसेवक विजयी ! २९ माजी नगरसेवक पराभूत !!पुढील वर्षी आनंदराव पाटील चुयेकरांच्या स्मृतिदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करणारकोल्हापूर महापालिकेतील ८१ जागेवरील विजयी उमेदवारकोल्हापूर महापालिकेत सत्तांतर, महायुतीला 45 जागा ! काँग्रेसचे 34 उमेदवार विजयी !!घघ मणकोल्हापूर महापालिकेसाठी सुमारे 70 टक्के मतदानडीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभकार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी नेत्यांचे मतदान !लघु-मध्यम स्केल इंडस्ट्रीला प्रोत्साहित केल्यास नवीन उद्योजक घडतील – माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभूशाहूपुरीत भगवा झंझावात, प्रकाश नाईकनवरे, नीलिमा पाटील यांची जंगी रॅली

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेतील ८१ जागेवरील विजयी उमेदवार

schedule16 Jan 26 person by visibility 285 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले. महायुतीने ८१ जागांपैकी ४५ जागा जिंकत सत्तांतर घडविले. भाजपाला २६, शिवसेनेला १५ व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला चार जागा मिळाल्या. काँग्रेसला ३४ जागा मिळाल्या. कोल्हापूर महापालिकेत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता स्थापन होत आहे. जनसुराज्य शक्ती पक्षानेही एक जागा जिंकत विजयाचा गुलाल उधळला. शिवसेना ठाकरे पक्षाला एक जागा मिळाली. तर आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळाली नाही. अपक्ष उमेदवारांचा टिकाव लागला नाही.

प्रभाग क्रमांक मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले. यामध्ये काँग्रेसचे सुभाष राजाराम बुचडे, पुष्पा निलेश नरुटे, रुपाली अजित पोवार व सचिन हरिष चौगुले विजयी झाले. कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, सर्किट हाऊस परिसर या भागावर पुन्हा एकदा शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम यांचा प्रभाव दिसून आला. प्रभाग दोनमध्ये महायुती अंतर्गत शिवसेनेचे उमेदवार वैभव दिलीप माने, अर्चना उमेश पागर, प्राजक्ता अभिषेक जाधव आणि स्वरुप सुनील कदम हे विजयी झाले. खासदार धनंजय महाडिक यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये प्रमोद भगवान देसाई, वंदना विश्वजीत मोहिते, राजनंदा तानाजी कदम आणि विजेंद्र विश्वास माने यांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक चार व पाचमध्ये काँग्रेसचा बोलबाला पाहावयास मिळाला. या प्रभागात काँग्रेसचे स्वाती सचिन कांबळे, विशाल शिवाजी चव्हाण, दीपाली  राजेश घाटगे, राजेश लाटकर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेसचे उमेदवार विनायक कृष्णराव कारंडे, स्वाती सागर यवलुजे,अर्जुन आनंदराव माने विजयी झाले. तर याच प्रभागतील सर्वसाधारण महिला गटात भाजपच्या पल्लवी निलेश देसाई विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेनेकडून शिला अशोक सोनुले, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या माधवी प्रकाश गवंडी, भाजपच्या दीपा दीपक काटकर आणि काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव निवडून आले. प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना व भाजपाने यश मिळवले. येथे शिवसेनेकडून ऋतुराज राजेश क्षीरसागर, मंगल साळोखे, भाजपच्या दीपा ठाणेकर, विशाल शिराळे विजयी झाले. प्रभाग आठमध्ये शिवसेनेच्या अनुराधा खेडकर, काँग्रेसच्या ऋग्वेदा राहूल माने, इंद्रजीत बोंद्रे, प्रशांत खेडकर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेचे शारंगधर देशमुख, संगीता संजय सावंत, भाजपच्या माधवी मानसिंग पाटील व विजय देसाई हे विजयी झाले. प्रभाग दहामध्ये शिवसेनेचे अजय इंगवले, भाजपच्या अर्चना उत्तम कोराणे, पूर्वा राणे, आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग विजयी झाले.  प्रभाग क्रमांक  अकरामध्ये भाजपच्या माधुरी नकाते, निलांबरी साळोखे, शिवसेनेचे सत्यजीत चंद्रकांत जाधव आणि काँग्रेसच्या जयश्री चव्हाण विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक बारामध्ये  महायुतीकडील शिवसेनेचे उमेदवार आशकिन आजरेकर, राष्ट्रवाद काँग्रेसचे आदिल बाबू फरास, काँग्रेसच्या स्वालिया साहिल बागवान आणि काँग्रेसच्या अनुराधा अभिमन्यू मुळीक विजयी झाले. प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपच्या माधुरी शशिकांत व्हटकर, रेखा रामचंद्र उगवे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून नियाज खान तर काँग्रेसकडून प्रवीण सोनवणे विजयी झाले. प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपच्या निलिमा पाटील, तर काँग्रेसकडून अमर समर्थ, विनायक फाळके, दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला विजयी झाल्या.

प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेसचे उमेदवार संजय मोहिते, रोहित शिवाजी कवाळे, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रतिज्ञा उत्तुरे व भाजपच्या सृष्टी करण जाधव विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक सोळामध्ये काँग्रेसचे उमेश पोवार, धनश्री कोरवी तर भाजपचे मुरलीधर जाधव, पूजा पोवार यांनी विजयाचा गुलाल उधळला. प्रभाग सतरामध्ये काँग्रेसचे प्रवीण केसरकर, शुभांगी पाटील, सचिन शेंडे, प्रियांका कांबळे  विजयी झाले. प्रभाग क्रमांक अठरामध्ये  काँग्रेसच्या अरुणा गवळी, शिवसेनेच्या कौसर बागवान, भाजपच्या रुपाराणी निकम, बबन मोकाशी विजयी झाले. प्रभाग क्रमांक १९ मध्ये काँग्रेसचे दुर्वास कदम, सुषमा जरग तर भाजपकडून विजय खाडे, मानसी लोळगे हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक वीसमध्ये काँग्रेसच्या जयश्री धनाजी कांबळे, तर भाजपच्या सुरेखा सुनील ओटवकर, वैभव अविनाश कुंभार, नेहा अभय तेंडूलकर तर शिवसेनेचे अभिजीत खतकर विजयी झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes