डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभ
schedule15 Jan 26 person by visibility 163 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचा तिसरा दीक्षांत समारंभ सोमवार (१९ जानेवारी २०२६) आयोजित केला आहे. उद्योगपती किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर्स (डी.लीट.) तर ओंस्ट्रो टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावित नाईक यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे.
तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे सायंकाळी पाच वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील व कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिली. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे उपस्थित होते. दीक्षांत समारंभात एकूण ९१२ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये ११ विद्यार्थ्यांना पीएच. डी. देण्यात येणार असून यावेळी १५ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गुप्ता यांनी यावेळी दिली. विद्यापीठाच्या ७० टक्केहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्या आहेत. १०० हून अधिक संशोधन असून २४ पेटंट प्राप्त झाली आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.