Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ कर्मचारी संघटनेकडून सुनिल वाडकरांच्या वक्तव्याचा निषेध; कडक कारवाईची मागणीकुलगुरु निवड लांबली, मुलाखती कधी होणार ? कुलपती कार्यालयाकडे लक्षजिल्हा परिषदेच्या सभेत विषय समित्यांवर सदस्यांच्या निवडीराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या - अभिजीत तायशेटेकोल्हापुरात बुधवारपासून मिलेटसह फळ महोत्सव कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरी

जाहिरात

 

कुलगुरु निवड लांबली, मुलाखती कधी होणार ? कुलपती कार्यालयाकडे लक्ष

schedule21 Apr 26 person by visibility 92 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  शॉर्टलिस्ट नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होऊन तीन आठवडे होत आले. मात्र कुलपती कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी अजून तारखा कळविल्या नाहीत. यामुळे कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. गेले नऊ महिने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त आहे. विद्यापीठाचा नवा कुलगुरू कोण असणार याकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष आहे.  

राज्यातील नामांकित विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. कोल्हापुर, सांगली, सातारा जिल्हा कार्यक्षेत्र आणि संलग्नित कॉलेजिअस संख्या जवळपास ३००. तत्कालिन कुलगुरू डी. टी. शिर्के शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. सध्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे तर प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव आहेत. दरम्यान कुलगुरू शोध समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. २३ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ११५ जणांनी अर्ज दाखल केले. फेब्रुवारी महिन्यात त्या अर्जांची छाननी झाली. त्यातून समितीने २८ उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली.

कुलगुरुपदासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांमध्ये मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण, पदार्थ विज्ञान विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. एस. एस. कोळेकर, यांचा समावेश आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. संजय ढोले, डॉ. संजय चाकणे, डॉ. विलास खरात, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सतीश पाटील, डॉ. ए. एम. महाजन, डॉ. नितीन देसाई, डॉ. विजय खरे, डॉ. स्मिता देशमुख, डॉ. राजेश गच्चे, श्रीमती डॉ. बेलनकर,प्रा. डॉ. जोगी, एनआयटीमधील राजेंद्र काकडे यांचा समावेश होता. या २८ उमेदवारांच्या मुलाखती तीन व चार एप्रिल २०२६ रोजी मुंबईत झाल्या. पहिल्या दिवशी २० तर दुसऱ्या दिवशी आठ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.

या मुलाखतीच्या प्रक्रियेतून पाच उमेदवारांची नावे कुलगुरुपदासाठी कुलपती कार्यालयाकडे सादर होतील. कुलपतींमार्फत त्या पाच जण उमेदवारांतून एका उमेदवाराची कुलगुरू म्हणून निवड होते. कुलगुरू निवड होण्यापूर्वी त्या पाच उमेदवारांची कुलपती तथा राज्यपाल मुलाखती घेतात.दरम्यान कुलपती कार्यालयाकडून अद्याप पाच उमेदवारांना मुलाखतीसाठी तारखा कळविल्या नाहीत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes