Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या - अभिजीत तायशेटेकोल्हापुरात बुधवारपासून मिलेटसह फळ महोत्सव कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरीप्राचार्य मधुकर बाचुळकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे बुधवारी प्रकाशनशिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांचा निषेध आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफ

जाहिरात

 

राधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या - अभिजीत तायशेटे

schedule20 Apr 26 person by visibility 23 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे (गोकुळ)  दूध पुरवठा करणाऱ्या सुमारे ११०० हून अधिक संस्थांबाबत तक्रारीनंतर मध्यंतरी अवसादनाचे आदेश देण्यात आले असून संबंधित संस्थांची पात्रता तपासणी व सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र राधानगरी व शाहूवाडी तालुक्यातील अनेक संस्थांना अद्याप सुनावणीसाठी नोटीस मिळालेली नसल्याचे समोर आले  आहे.

याबाबत संदर्भात गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी कोल्हापूर सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना ताराबाई पार्क येथील कार्यालयामध्ये निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.  अनेक संस्थांना आपले लेखी म्हणणे सादर करण्यासाठी अद्याप बोलावले गेलेले नाही. तसेच काही तालुक्यांतील संस्थांना नोटीस देऊनही प्रत्यक्ष सुनावणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ज्या संस्थांना अद्याप नोटीस प्राप्त झालेली नाही, त्यांना तातडीने नोटीस देण्यात यावी, तसेच ज्या संस्थांची सुनावणी प्रलंबित आहे ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून संबंधित संस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे अनेक दूध उत्पादक संस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पारदर्शकपणे निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes