Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ कर्मचारी संघटनेकडून सुनिल वाडकरांच्या वक्तव्याचा निषेध; कडक कारवाईची मागणीकुलगुरु निवड लांबली, मुलाखती कधी होणार ? कुलपती कार्यालयाकडे लक्षजिल्हा परिषदेच्या सभेत विषय समित्यांवर सदस्यांच्या निवडीराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या - अभिजीत तायशेटेकोल्हापुरात बुधवारपासून मिलेटसह फळ महोत्सव कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरी

जाहिरात

 

गोकुळ कर्मचारी संघटनेकडून सुनिल वाडकरांच्या वक्तव्याचा निषेध; कडक कारवाईची मागणी

schedule21 Apr 26 person by visibility 14 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेच्या भूमिकेबाबत गोकुळचे कर्मचारी तसेच कोल्हापूर महापालिकेचे स्वीकृत सदस्य सुनिल दिनकर वाडकर यांनी दिलेली प्रतिक्रिया ही स्वार्थी व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत गोकुळ  कर्मचारी संघटनेने केला. तसेच कर्मचारी संघटनेने वाडकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे म्हटले.  वाडकरांची भूमिका निरर्थक असून संस्थेची व संघटनेची बदनामी करणारी आहे. तसेच अशा प्रवृत्तीवर व्यवस्थापनाने तातडीने व कडक कारवाई करावी, अशी मागणी गेट मीटिंगद्वारे गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे  कर्मचाऱ्यांनी एकमुखाने केली.

 ‘गेली चाळीस वर्षे संघटना व व्यवस्थापन यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार व सेवा ज्येष्ठतेच्या निकषांवरच पदोन्नतीची प्रक्रिया पार पडत आली आहे. कोणत्याही प्रकारची मनमानी किंवा अन्यायकारक निर्णय प्रक्रिया संघटनेने कधीही मान्य केलेली नाही. मागील संचालक मंडळ व संघटनेदरम्यान झालेल्या करारानुसार १२० रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला होता. दरम्यानच्या काळात सन २०२१ मध्ये सत्तांतर होऊन नवीन संचालक मंडळ निवडून आले असले तरी संघटनेने सातत्याने पाठपुरावा करून संबंधित कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यास भाग पाडले.’ असे संघटनेने म्हटले आहे.

गेट मीटिंगमध्ये संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या हिताला बाधा आणणाऱ्या कोणत्याही कृतीला विरोध करण्याचे आवाहन केले. मीटिंग सुरू असतानाच कर्मचारी वाडकर हे व्यवस्थापनाला भेटण्यासाठी आले असता, संघटनेच्या सदस्यांनी त्यांच्याकडून त्यांच्या वक्तव्याबाबत खुलासा करून घेतला. वाडकर यांच्या कामकाजासंदर्भातील एक चुकीची बाब पुराव्यानिशी मांडून ती त्यांच्या समोरच स्पष्ट करून सिद्ध केली असेही संघटनेने म्हटले आहे. ‘संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणालाही आपले राजकारण साध्य करू दिले जाणार नाही,” असा ठाम निर्णय या गेट मीटिंगमध्ये घेण्यात आला. यावेळी कॉम्रेड संभाजी शेलार, दत्ता बच्चे, योगेश चव्हाण, संदेश पाटील, कृष्णात चौगले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes