वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरी
schedule20 Apr 26 person by visibility 19 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
रविवारी, सायंकाळी चित्रदुर्ग मठ येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, वीणा व बाळासाहेब साव्याण्णावर यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. चित्रदुर्ग मठाचे मठाधीश शिवानंद महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा ठेवलेली पालखीची सजावट केली होती. मिरवणुकीतील प्रबोधनात्मक फलक लक्षवेधी ठरली.’झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणारचे रक्षण करा’या आशयाचे फलक होते. महापुरुषांच्या वेशभूषेतील बालचमू आकर्षण ठरला. आईसाहेब महाराज पुतळा, गवळी गल्ली, तेली गल्ली, नष्टे गल्ली, शनिवार पेठ पोस्ट ऑफिसमार्गे मिरवणूक चित्रदुर्ग मठ येथे परतली.
मिरवणुकीत समाजाचे अध्यक्ष किरण गवळी, राहुल नष्टे, सुनील गाताडे, सुहास भेंडे, राजू वाली, राजेश पाटील चंदूरकर, केतन तवटे, अविनाश नासिपुडे, चंद्रकांत हळदे, राजेंद्र करंबळी, चंद्रकांत नासिपुडे, गणेश सन्नकी, प्रशांत करंबळी, सत्यजीत सांगावकर, गुरुदेव स्वामी, संजय बोधले, सत्यजीत सांगावकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंदा कुलकर्णी, अमृता करंबळी, स्मिता हळदे, मंदा सावर्डेकर, महादेवी बोधले, भाग्यश्री खोबरे, सविता सन्नकी, अन्विशा नासिपुडे आदींचा सहभाग होता.