मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने विसर्जन मिरवणूकीस सुरवात
schedule25 Sep 26 person by visibility 15 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा उद्घाटन सोहळा आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील महापौर रुपाराणी निकम आणि माझ्या उपस्थितीत झाला.
कोल्हापूरच्या अनंत चतुर्दशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकमध्ये पहिला मान असलेल्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीने कोल्हापूरच्या सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, विषेश पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलिस अधिक्षक निलोत्पल बसू, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष प्रविण केसरकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक विनायक फाळके, रमेश पुरेकर, तसेच वसंतराव मुळीक, कादर मलबारी, अँड धनंजय पठाडे, सागर यवलुजे, साहील बागवान, लालासाहेब गायकवाड, श्रीकांत माने, तालमीचे अध्यक्ष शिवाजी पवार, उत्सव कमिटीचे अध्यक्ष सिद्धेश पवार उपस्थित होते.