Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधनजतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत  मार्गदर्शनमानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने विसर्जन मिरवणूकीस सुरवातआत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव सत्यजीत पाटील गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडी सोबतमहायुतीत कोणी छोटा- मोठा नाही, आम्ही सगळे जुळेभाऊ ! आमच्याकडे ४४०० ठराव, शुक्रवारी प्रचार शुभारंभ ! !महायुतीची गोकुळसाठी महाचर्चा, कोल्हापुरात एकवटले दिग्गज नेते ! जागावाटप संबंधी निर्णय होणार !!अरुण डोंगळेशी खटके, ए वाय पाटलांनी घेतली विनय कोरेंची भेटमहाविकास आघाडीचं ठरलं…शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर ! पदवीधरसाठी डॉ.हर्षदा देशमुख जाधव ?बाजार समितीच्या वार्षिक सभेला सोळा संचालक…५५ सभासद ! सभासदांची नगण्य उपस्थिती चिंताजनक ! !

जाहिरात

 

जतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत  मार्गदर्शन

schedule25 Sep 26 person by visibility 16 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या व जत तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी जत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणेशभक्त, महिला व नागरिकांशी संवाद साधला. महिला सक्षमीकरण, सामाजिक समस्या तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
                                                                                                                                         
तहसीलदार धानोरकर यांनी शिवनगर गणेशोत्सव मंडळ तसेच सुनेत्रा कॉलनी गणेशोत्सव मंडळास भेट दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद सरकारच्या लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती दिली.

‘लक्ष्मी मुक्ती’सह महिलांच्या सन्मानाशी संबंधित उपक्रमांची माहिती देताना तहसीलदार धानोरकर म्हणाले, महिलांना कुटुंबातील मालमत्तेमध्ये योग्य हक्क व सहभाग मिळणे आवश्यक आहे. मालमत्तेमध्ये सहभागीदार करण्यासाठी लक्ष्मीमुक्ती योजना असून, यातून महिलांच्या हक्कांचे संरक्षण होणार आहे. यातून कुटुंबातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होतील.

महिलांच्या हक्कासाठी असणाऱ्या विविध कायदेशीर तरतुदींची माहिती देऊन तहसीलदार प्रवीण धानोरकर म्हणाले, हुंडामुक्ती, कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध कायदेशीर उपाययोजना याबाबत महिलांनी जागरूक राहावे. आपल्या हक्कांबाबत सजग राहावे. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या तरतुदींबाबत माहिती देत, महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्याय सहन करू नये, असे ते म्हणाले. 

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार आवश्यक अर्ज व प्रक्रिया पूर्ण करता येते, याबाबत नागरिकांनी संबंधित महसूल कार्यालयाकडून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन करून तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, त्यांचे संरक्षण आणि समान संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्व विषद केले. तसेच, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या संवादावेळी सहाय्यक महसूल अधिकारी राहूल कोळी, ग्राम महसूल अधिकारी विलास सूर्यवंशी, महसूल सेवक सुभाष कोळी यांच्यासह सुनेत्रा कॉलनी गणेशोत्सव मंडळ येथे गणेश मंडळाचे प्रमोद संकपाळ, अमित कोळी, संभाजी कोडग तसेच शिवनगर गणेशोत्सव मंडळ येथे चंद्रकांत कुंभार, सुनील गिरी गोसावी, अनिल देशपांडे, अशोक स्वामी, नंदकुमार साळुंखे, सुरेश साळुंखे, प्रशांत साळुंखे, जगदीश हिरेमठ, प्रशांत हिरेमठ  उपस्थित होते. 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes