महायुतीची गोकुळसाठी महाचर्चा, कोल्हापुरात एकवटले दिग्गज नेते ! जागावाटप संबंधी निर्णय होणार !!
schedule24 Sep 26 person by visibility 317 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जागा वाटपा संदर्भात चर्चा करण्याकरिता महायुतीचे नेतेमंडळी कोल्हापुरात एकवटले आहेत. गुरुवारी दुपारपासून हॉटेल पॅवेलियन येथे मॅरेथॉन बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेतेमंडळीसह गोकुळचे माजी चेअरमन,संचालकांचा समावेश आहे.
गोकुळसाठी ऑक्टोंबर महिन्यामध्ये मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल व छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रशासनाने गुरुवारी छाननी नंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर राजकीय पक्षाकडून जागा वाटपाच्या प्रक्रियेला वेग घेतला आहे. हॉटेल पॅवेलियन नेते महायुतीचे सगळे नेते मंडळी गुरुवारी दुपारी एकवटले. पहिल्यांदा मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्यशक्ती पक्षाचे नेते विनय कोरे व आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये बैठक झाली. यानंतर या बैठकीत महायुतीतील इतर पक्षातील नेते मंडळी सहभागी झाले. दुपारी चार वाजता मंत्री पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार महाडिक, आमदार कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार महाडिक, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, माजी संचालक बाळासाहेब खाडे , अंबरीश घाटगे, अजित नरके प्रा. किसन चौगुले, रणजीत पाटील, युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे आदींचा सहभाग होता. गोकुळची निवडणूक माहिती तर्फे एकत्रित लढविण्यात येणार आहे गोकुळचे एकूण 25 जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा फार्मुला कसा असावा या अनुषंगाने चर्चा करण्याकरता बैठक आयोजित करण्यात आली आहे.