Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत कोणी छोटा- मोठा नाही, आम्ही सगळे जुळेभाऊ ! आमच्याकडे ४४०० ठराव, शुक्रवारी प्रचार शुभारंभ ! !महायुतीची गोकुळसाठी महाचर्चा, कोल्हापुरात एकवटले दिग्गज नेते ! जागावाटप संबंधी निर्णय होणार !!अरुण डोंगळेशी खटके, ए वाय पाटलांनी घेतली विनय कोरेंची भेटमहाविकास आघाडीचं ठरलं…शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर ! पदवीधरसाठी डॉ.हर्षदा देशमुख जाधव ?बाजार समितीच्या वार्षिक सभेला सोळा संचालक…५५ सभासद ! सभासदांची नगण्य उपस्थिती चिंताजनक ! ! जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी लाटला कोटयवधीचा निधी, काँग्रेसच्या सदस्यांचा पदाधिकाऱ्यांच्यावर हल्लाबोल ! अध्यक्ष- उपाध्यक्ष -सभापती तुपाशी, सदस्य उपाशी!!रोटरी क्लब ऑफ गार्गीजर्फे  यामिनी प्रदर्शनजिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक ! जिल्हा परिषदेची बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्दशिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदान

जाहिरात

 

महायुतीत कोणी छोटा- मोठा नाही, आम्ही सगळे जुळेभाऊ ! आमच्याकडे ४४०० ठराव, शुक्रवारी प्रचार शुभारंभ ! !

schedule24 Sep 26 person by visibility 233 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: महायुतीमध्ये कोणी छोटा नाही की कोणी मोठा नाही. आम्ही सगळे जुळेभाऊ आहोत. गोकुळची निवडणूक आम्ही सारे महायुती म्हणून एकत्रित लढविणार आहोत. महायुतीतील सगळया घटक पक्षाकडे मिळून ४४०० ठराव आहेत. यामुळे विजय निश्चित आहे. महायुतीचे सगळे नेतेमंडळी शुक्रवारी, २५ सप्टेंबर २०२६ करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोकुळच्या निवडणुकीच्या जागा वाटपासंबंधी चर्चा करण्यासाठी गुरुवारी, २४ सप्टेंबर महायुतीतीच्या नेतेमंडळीची बैठक झाली. मंत्री पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत गोकुळच्या निवडणुकीची रणनिती ठरली. या पत्रकार परिषेदत मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या बिनविरोध निवडणुकीची चर्चा फेटाळून लावली. बिनविरोध निवडणूक शक्य नाही असे स्पष्ट केले. तसेच अदृश्य शक्ती आता लुप्त झाली. प्राथमिक दूध संस्था पात्र अपात्रतेवरुन १४०० संस्था प्रतिनिधीमध्ये जी नाराजी होती, ती निश्चित दूर होईल. सगळे आनंदाने मतदान करतील असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

बैठकीतील चर्चेसंबंधी बोलताना मंत्री पाटील यांनी ‘शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ होईल. सात तारखेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. या कालावधीत कोणाकडे किती ठराव आहेत, यावरुन जागा वाटपाचा निर्णय होईल. महायुतीमध्ये कसलेही मतभेद नाहीत. मनभेद नाहीत. कोणी छोटा नाही. कोणी मोठा भाऊ नाही. आम्ही सगळे जुळेभाऊ आहोत.’असे त्यांनी नमूद केले.

बैठकीला चंदगडचे आमदार शिवाजी पाटील नव्हते यावर बोलताना पालकमंत्री आबिटकर व आमदार कोरे यांनी सध्या गणेश उत्सव सुरू आहे. यामुळे ते येऊ शकले नाहीत असे सांगितले. मंत्री पाटील यांनी आमदार पाटील यांचा ठाणे येथे गणेश उत्सव असल्याने ते आज येऊ शकले नाहीत. असे सांगितले. याप्रसंगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, गोकुळचे माजी संचालक बाळासाहेब खाडे, अंबरिश घाटगे, अजित नरके, प्रा. किसन चौगले, रणजित पाटील, युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेते सुधीर देसाई, आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes