सावळाच रंग तुझाने रसिक मंत्रमुग्ध ! वंदना गुप्तेंच्या भेटीने प्रेक्षक सुखावले!
schedule11 Jan 26 person by visibility 22 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रसिकाग्रणी मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित संगीत संमेलनाचा समारोप झाला. संमेलनाच्या समारोपाच्या दिनी, पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्वर सांगाती आयोजित सावळाच रंग तुझा या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात माणिक वर्मांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी संध्याकाळी संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला त्यांच्या कन्या ख्यातनाम अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या उपस्थितीने रसिकांना भुरळ पाडली.
वंदना गुप्ते या सभागृहामध्ये आल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना भेटल्या. महिलांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढली. गळा भेट घेतली. या कार्यक्रमांमध्ये वंदना गुप्ते यांचा सत्कार राष्ट्रपती पदक विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये माणिक ताईंच्या गायकीवर पीएचडी केलेल्या ज्येष्ठ गायिका डॉ. शितल धर्माधिकारी, कुलकर्णी आणि गौतमी चिपळूणकर यांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमांमध्ये , इथेच आणि या बांधावर, घननिळा लडीवाळा, मला मदन भासे हा, अमृताहुनी गोड, सावळाच रंग तुझा, येऊ कशी घनश्याम.. अशी एक हून एक सुंदर गाण्यांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमादरम्यान स्लाईड शो च्या माध्यमातून माणिक वर्मा यांच्या जीवनातील अनेक गोष्टींना उजाळा दिला गेला.
कार्यक्रमाला साथ संगत संदेश खेडेकर (तबला) केदार गुळवणी (व्हायोलीन) अमित साळोखे (हार्मिनियम) शिवाजी सुतार (कीबोर्ड) सचिन जगताप (बासरी) गुरू ढोले (ऑक्टोपॅड) प्रसन्न बराटे (पखवाज) तर निवेदन मनिष आपटे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रसाद कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमास मंचाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, नियामक मंडळाचे चेअरमन निर्मल लोहिया, संस्थेचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, राजेश लोहिया, संतोष शाह, डॉ. ज.ल. नागावकर, डॉ. हेमिनी चांदेलकर, सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य एस एस. चव्हाण, सतीश कुलकर्णी उपस्थित होते.