यंग सिनीअर्सची रंग-रेषांची दुनिया ! शाहू स्मारक भवनमध्ये चित्र प्रदर्शन !!
schedule08 May 26 person by visibility 12 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ते सगळे वयाची साठी ओलांडलेले…विविध क्षेत्रात काम केलेले.. वेगवेगळया ठिकाणी राहणारे. त्यांचा सत्तरहून अधिक जणांचा ग्रुप आहे. ‘ओल्ड इज गोल्ड’या नावांनी हा ग्रुप परिचित आहे. मात्र त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन, साऱ्यांना रंग आणि रेषांच्या दुनियेत रमणारे. चित्रकार. त्या प्रत्येकाची चित्रकारितेतील खासियत वेगळी. ‘ओल्ड इज गोल्ड ’ग्रुमधील चित्रकार अशोक धर्माधिकारी, अरुण सुतार आणि शिवाजी काटकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन कोल्हापुरात भरले आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथील कलादालन येथे सात ते ११ मे २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन आहे. सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत हे प्रदर्शन खुले असते.
या प्रदर्शनात जवळपास पन्नासहून अधिक कलाकृती आहेत. निसर्गचित्र, रचनाचित्रांचा समावेश आहे. चित्रकार अशोक धर्माधिकारी हे सिनीअर चित्रकार. वय वर्षे ८१. ते चित्रनिर्मिती, पेन्सिल सेडिंगचे काम करतात. कोल्हापुरातील स. म.लोहिया हायस्कूल येथून सेवानिवृत्त झाले आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, भवानी मंडप येथे रोज पेन्सिल स्केच करतात. प्रदर्शनात त्यांच्या १५ चित्रकृती आहेत.
अरुण सुतार हे व्यावसायिक चित्रकार आहेत. व्यक्तिचित्रमध्ये त्यांचा हातखंडा आहे. पूर्वी ते सिनेमा पोस्टर बनवित. खुदागवाह, हम अशा अनेक सिनमांचे पोस्टर तयार केले आहेत. कॅलेंडर डिझाइन करतात. पुणे, कागल, बेळगाव, इचलकरंजी, सांगली, नाशिक, कोल्हापुरात अशा विविध ठिकाणी प्रदर्शने भरविल आहेत. या प्रदर्शनात त्यांची वीस चित्रे आहेत. हौशी चित्रकार म्हणून शिवाजी काटकर यांची ओळख. राज्य सरकारच्या इरिगेशन विभागात ३५ वर्षे सेवा केली आहे. वॉल पेटिंग, स्प्रे पेटिंग, स्क्रीन प्रिटींगमध्ये कामे केली आहेत. २०२२ नंतर ते चित्रकला या विषयाकडे वळले. पेन्सिल सेडींग, रेखाचित्र, निसर्गचित्र रेखाटतात. या प्रदर्शनात त्यांच्या वीस कलाकृती आहेत.
दरम्यान बांधकाम व्यावसायिक आणी क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, महालक्ष्मी अॅपरल्सचे रवींद्र उबेरॉय, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे.