Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सत्तेत असताना सतेज पाटलांनी काय केले, आता आंदोलनाची नाटके कशासाठी – आमदार राजेश क्षीरसागरव्ही. बी. पाटलांचे मंत्री मुश्रीफांच्यावर गंभीर आरोप, भैया मानेंचा पलटवारद्रूतगती महामार्गावर ई चलनद्वारे बसधारकांची आर्थिक लूट, प्रदीप राठोडांचे सोमवारपासून आमरण उपोषणलवकरच महायुतीच्या नगरसेवकांची बैठक, कोल्हापूच्या विकासाचा आपला प्रयत्न - आमदार राजेश क्षीरसागर दक्षिणमधील तेरा गावाची जलजीवन योजना रखडली ! ! पाण्यासाठी घागर मोर्चा, कंत्राटदाराला पाण्याची आंघोळ ! ! आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकालसीआयआयच्या इंडियन वुमेन नेटवर्क महाराष्ट्र अध्यक्षपदी पल्लवी कोरगावकरमुख्याध्यापक संजय सौंदलगे  राज्यस्तरीय आयडियल टिचर पुरस्काराने सन्मानित९० दिवसात निवडणुका घ्या, गोकुळ निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेशबाजार समितीच्या तीन संचालकांना अपात्रतेसंबंधी नोटिस, १९ मे रोजी म्हणणे मांडण्याचे आदेश

जाहिरात

 

लवकरच महायुतीच्या नगरसेवकांची बैठक, कोल्हापूच्या विकासाचा आपला प्रयत्न - आमदार राजेश क्षीरसागर

schedule07 May 26 person by visibility 27 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला आहे.  शहरात विकासकामे सुरु आहेत. लवकरच महायुतीच्या नगरसेवकांची बैठक घेणार असून कोल्हापूरच्या विकासासाठी जी काही करावे लागेल,ते करून कोल्हापूरला विकासापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

 कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी  आज कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त  डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार क्षीरसागर यांनी घेतली. क्षीरसागर म्हणाले, पाच वर्षाचा प्रशासक राज संपून नुकतेच महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आले, मागील पाच वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आजची बैठक महत्वाची होती
  
खरं पाहता महानगरपालिकेची आर्थिक स्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही.  कोल्हापूर महानगरपालिकेच्या असलेल्या अनेक जागांवर ती प्रोजेक्ट उभे करून उत्पन्न वाढवणे, त्याचबरोबर   बऱ्याच प्रॉपर्टी चा घरफाळा  मनपा मध्ये जमा होत नाही,किंबहुना २५ टक्के घरफाळा देखील जमा होत नाही, याचं मॅपिंग करून तो पूर्ववत करून घेणे.पाणीपुरवठ्याचा विषय फार गंभीर आहे,तो सुरळीत करणे, टीडीआर घोटाळा किंवा यु डी सी पी आर च्या नियमावलीप्रमाणे ओपन स्पेस विकसित करत असताना टिडीआर देणे, रस्ते विकसित करताना टीडीआर देणे, अशा पद्धतीने सीएसआर मधून शहराचा विकास साधणे, त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग, आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कन्व्हेन्शन सेंटर,३२००  कोटीचा एम एम आर डी पी  प्रकल्प आदी बाबत बैठकीत चर्चा झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes