सीआयआयच्या इंडियन वुमेन नेटवर्क महाराष्ट्र अध्यक्षपदी पल्लवी कोरगावकर
schedule06 May 26 person by visibility 26 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) भारतीय महिला नेटवर्क महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील कोरगावकर ग्रुपच्या पल्लवी कोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे.या विभागाच्या कोल्हापूरातील श्रीमती कोरगावकर पहिल्या महिला आहेत.कॉन्फिड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गर्ग यांनी त्यांच्या अध्यक्ष पदी निवडीची घोषणा केली.
यापूर्वी पल्लवी कोरगावकर या दक्षिण महाराष्ट्रच्या सीआयआयच्या अध्यक्ष होत्या.इंडियन वुमेन नेटवर्क व्यावसायिक व करिअर करणाऱ्या महिलांसाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. महिलांना त्यांच्या संबंधित कौशल्य क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अशा महिलांना एकत्र आणणे.त्यांना नेतृत्व विकासासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करणे.त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणे हा याचा मुख्य हेतू आहे.
श्रीमती कोरगावकर यांच्या निवडीने भारतीय महिला नेटवर्क च्या महाराष्ट्र विभागाला एक अर्थपूर्ण योजना तयार करून महाराष्ट्राच्या महिला उद्योजक घडणीमध्ये योगदान देऊ शकू असे मत दीपक गर्ग यांनी व्यक्त केले.