मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यस्तरीय आयडियल टिचर पुरस्काराने सन्मानित
schedule06 May 26 person by visibility 54 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूल, कोल्हापूरचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांना ऑनलाईन वृतपत्र गंगाधर यांचेवतीने शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ च्या राज्यस्तरीय आयडियल टिचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांचे हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देवून त्यांचा विशेष समारंभात सपत्नीक सत्कार करण्यात आला . मुख्याध्यापक सौंदलगे यांची शालेय शिक्षण या विभागातून निवड करण्यात आली . त्यांच्या प्रशासकीय उपक्रमशीलता, साहित्यिक बाबी आणि विविध विषयाचा व्यासंग, प्रशिक्षण शिबीरातील मार्गदर्शन, विविध समित्यांवरील नियुक्ती या बाबींचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली . याप्रसंगी संपादक कमलाकर वर्टेकर,दादासाहेब लाड, डॉ . स्मिता गिरी, माधवी सौंदलगे, सविता पाटील उपस्थित होते .