Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यश

जाहिरात

 

महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!

schedule21 Sep 26 person by visibility 153 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे महायुतीमध्ये जागा वाटपाचे सूत्र अजून निश्चित  झाले नाही दरम्यान येत्या गुरुवारी 24 सप्टेंबर 2026 रोजी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी 11 वाजता महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ मेळावा होणार आहे या संदर्भातील माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.कोण किती अर्ज किती भरले यापेक्षा संख्याबळ किती आहे हे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणेच आमचे पॅनेल ठरेल. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. गोकुळ दूध संघामध्ये महायुतीतील जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. संख्याबळ निश्चित करण्यासाठी आम्हाला एकत्र बसावे लागेल आणि संख्याबळ निश्चित करावे लागेल. त्यानंतर आठ ऑक्टोबर रोजी माघारीच्या वेळीच पॅनेल जाहीर होईल. असे मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
​              
  राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर राज्य सरकारची भूमिका काय आहे, या प्रश्नावर  मुश्रीफ म्हणाले, राज्यामध्ये गेले महिना दीड- महिने पावसाचा खंड पडून सर्वच पिके धोक्यात आलेली आहेत आणि दुष्काळसदृश परिस्थिती तयार झालेली आहे. या संदर्भात कृषिमंत्री दत्तामामा भरणे हे संपूर्ण राज्याचा दौरा करीत आहेत. त्यांच्यावरील टिकेबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीबद्दल उद्याच मंत्रिमंडळाची बैठक आहे. मुख्यमंत्री  या विषयावर भाष्य करतील. 
          
 गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फेटाळून लावली.
 अदृश्य शक्तीबाबत विचारले असता ते म्हणाले, आता अदृश्य शक्ती लुप्त झालेली आहे असे त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चेला पूर्णविराम कधी मिळेल ? या प्रश्नावर  मुश्रीफ म्हणाले, असा पूर्णविराम सात ऑक्टोबर रोजीच मिळेल.
​       दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले,ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर अशी संकटे आली त्या त्या वेळी शरद पवार यांनी अनेक वेळा महाराष्ट्राचे दौरे केलेले आहेत. आताही ते दौरे करीत आहेत. वास्तविक; त्यांनी विश्रांती घेण्याची गरज आहे. परंतु; जनता आणि शेतकऱ्यांप्रतीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 
       औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा रद्द झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या काटेकोर सूचना दिलेल्या आहेत. या परीक्षा पुन्हा घेतल्या जातील. पुढच्या काळात पेपर फुटणार नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट केलेले आहेत त्यांचे कष्ट वाया जाऊ नयेत
यासाठी राज्य सरकारने अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे.
यापुढे अशा परीक्षा या पारदर्शकच होतील. राज्यातील पेपरफुटीचे प्रकरण, दुष्काळ प्रकरण अशा गोष्टींवर आमदार रोहित पवार ॲक्टिव मोडवर आल्याकडे लक्ष वेधले असता  मुश्रीफ म्हणाले, आमदार रोहित पवार हे एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. दरम्यान;  त्यांच्याबद्दल यापूर्वीही मी अनेक वेळा सांगितलेले आहे. ते मोकळी झालेली स्पेस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पेपरफुटी असेल, दुष्काळी परिस्थिती असेल यावर महाराष्ट्र राज्य शासन अतिशय गंभीर आहे आणि अशा समस्यांचा सरकार मुकाबला करीत आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes