गोकुळमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
schedule26 Jan 26 person by visibility 29 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी चेअरमन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, संघाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ताराबाई पार्क येथील गोकुळच्या आवारात संचालक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते झाले. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणा-या संघाच्या दूध शितकरण केंद्रावरही राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करणेत आले. गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक प्रकाश पाटील व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना येथे संचालक डॉ.सुजित मिणचेकर, गडहिंग्लज चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक मुरलीधर जाधव, बिद्री चिलिंग सेंटर कर्मचारी भरत देवर्डेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटर कर्मचारी शरद जोशी व मारुती मोकाशी यांच्या हस्ते करणेत आले.
यावेळी संघाचे संचालक डॉ.चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.