शिवसेनेच्या गटनेतेपदी शारंगधर देशमुख
schedule26 Jan 26 person by visibility 18 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नगरसेवक शारंगधर देशमुख यांची निवड करण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवालय येथे झालेल्या या बैठकीत देशमुख यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, सत्यजीत जाधव, वैभव माने, स्वरुप कदम, अजय इंगवले, अश्किन आजरेकर, अभिजीत खतकर,नगरसेविका अनुराधा खेडकर, अर्चना पागर, संगीता सावंत, मंगला साळोखे, प्राजक्ता जाधव, शिला सोनुले, कौसर बागवान आदी उपस्थित होते. गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक देशमुख यांचा आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.