Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑलसमग्र शिक्षा संघर्ष समितीच्या मुंबई येथील आंदोलनास यशडीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीवार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !

schedule02 Jul 26 person by visibility 101 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन पद्तीने आयाजन करण्यासंबंधी आयबीपीएसशी पत्र व्यवहार केला आहे. २८ जून २०२६ रोजी आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली आहे. टीईटीचा पेपर फुटल्यामुळे राज्य परीक्षा परिषद, शिक्षण विभाग व सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्य परीक्षा परिषदेने आयबीपीएसला टीईटी ऑनलाइन पद्धतीने घेण्यासंबंधी पत्र पाठविले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. सेवेतील शिक्षक व सेवेत येणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी २०२८ पर्यत मुदत दिली आहे. राज्य परीक्षा परिषदेने २८ जून २०२६ रोजी या परीक्षेचे आयोजन केले होते. राज्यभरातील १७२९ परीक्षा केंद्रावर पेपर एक व पेपर दोनसाठी मिळून तब्बल सहा लाख १२५ परीक्षार्थी ही परीक्षा देणार होते. दरम्यान पेपर फुटीचा प्रकार घडल्याने २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली. दरम्यान या परीक्षा लवकर घेण्यासंदर्भात परीक्षा परिषदेने पावले उचलली आहेत. राज्य परीक्षा परिषद पुणेचे आयुक्त महेश चोथे यांनी आयबीपीएसला पत्र पाठवून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शक्य तितक्या लवकर सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घ्याव्यात. यासाठी ऑनलाइन कार्यपद्धतीचा अवलंब करावा असे म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes