Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
थायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा डॉ. मेघा पानसरे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, कुसुम अलाम, वर्षा ढोके  यांना पुरस्कारशिवसेना ठाकरे पक्षातर्फे  सोनम वांगचुकांच्या लढ्याला पाठिंबा ! सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी ! ! काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी संपत पाटील, अमोल माने भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभार

जाहिरात

 

४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा

schedule20 Jul 26 person by visibility 83 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मागच्या काळामध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांनी या पोटनियमांची पायमल्ली करून काही संस्थांना सभासदत्व दिले. आज तेच नेते या मुद्द्याचं राजकारण करू पाहत आहेत. वास्तविक पाहता संस्थांची यामध्ये काही चूक नाही. पण पोटनियम डावलल्यामुळे रीतसर त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे अश्या संस्थांशी व्यवहार बंद न करता त्यांना दुय्यम किंवा ब वर्ग सभासद म्हणून कायम ठेवता येईल का ? आणि भविष्यात त्यांच्याकडून पोटनियमांचे पालन आणि अटींची पूर्तता करून पुन्हा सभासद होण्याची संधी देता येईल का ? याचा सहानुभीतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. तत्कालिन संचालक व कार्यकारी संचालकांनीही पोटनियमाबद्ल संबंधित संस्थांना माहिती द्यायला हवी होती.’अशी स्पष्ट भूमिका शौमिका महाडिक यांनी मांडली. 

 राज्य सरकारच्या व्दिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांनी संबधित ४१० दूध संस्थांचे सभासद रद्द करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. या संस्थांनी कोल्हापूर सर्कीट बेंचमध्ये अपील केली असताना न्यायालयाने ‘गोकुळ’च्या प्रशासनाने नैसर्गिक न्याय तत्वानुसार निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. त्यानुसार संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी त्या ४१० दूध संस्थांना सभासदत्व रद्द का करु नये? अशा आशयाच्या नोटीसा बजावल्या आहेत. या संस्थांनी शौमिका महाडीक यांच्यासह भाजपच्या संचालकांची भेट घेतली. या संस्था प्रतिनिधींसह महाडीक, डॉ. चेतन नरके, विश्वास जाधव,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, प्रमोद पाटील यांनी सोमवारी, २० जुलै रोजी‘गोकुळ’च्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य बलकवडे यांची भेट घेतली. 

 ‘गोकुळ’शी सलग्न ४१० दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत बजावलेल्या नोटीसामुळे संस्था पातळीवर अस्वस्थता पसरली आहे. संघाच्या पोटनियमानुसार संस्थांना नोटीसा पाठवल्या असल्या तरी कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्याला व्यवहाराची सांगड घालून त्या संस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी ‘गोकुळ’च्या माजी संचालिक महाडीक, माजी संचालक नरके यांनी प्रशासकांकडे केली. ‘जिल्ह्यातील सर्वच दूध संस्था आमच्या आहेत. त्यांच्या बळावरच आज ‘गोकुळ’ उभारला आहे, याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. त्यासोबतच कोणतीही सहकारी संस्था ही पोटनियमानुसार चालते, हेही आम्ही जाणतो. दुर्दैवाने मागच्या काळामध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांनी या पोटनियमांची पायमल्ली करून काही संस्थांना सभासदत्व दिले. आज तेच नेते या मुद्द्याचं राजकारण करू पाहत आहेत. वास्तविक पाहता संस्थांची यामध्ये काही चूक नाही. पण पोटनियम डावलल्यामुळे रीतसर त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे अश्या संस्थांशी व्यवहार बंद न करता त्यांना दुय्यम किंवा ब वर्ग सभासद म्हणून कायम ठेवता येईल का ? आणि भविष्यात त्यांच्याकडून पोटनियमांचे पालन आणि अटींची पूर्तता करून पुन्हा सभासद होण्याची संधी देता येईल का ? याचा सहानुभीतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, म्हणून आम्ही आज प्रशासकांची भेट घेतली."असेही त्यांनी सांगितले.
दुय्यम फळीतील नेते काय बोलतात यापेक्षा नेते काय म्हणतात हे महत्वाचं

 

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना महाडिक म्हणाल्या,"काही लोक महायुतीत नवे आहेत, उत्साही आहेत. नेत्यांना खुश करण्यासाठी काहीतरी बोलून जातात. त्यामुळे ते काय म्हणतात यापेक्षा नेते काय म्हणतात हे महत्वाचं आहे. मुश्रीफ साहेब आणि आम्ही महायुतीचा सन्मान करतो. त्यामुळे महायुती म्हणून आम्ही एकसंघपणेच भविष्यातील वाटचाल करू. तसेच गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी या मताची मी आहे. असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes