Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
थायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा डॉ. मेघा पानसरे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, कुसुम अलाम, वर्षा ढोके  यांना पुरस्कारशिवसेना ठाकरे पक्षातर्फे  सोनम वांगचुकांच्या लढ्याला पाठिंबा ! सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी ! ! काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी संपत पाटील, अमोल माने भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभार

जाहिरात

 

सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी

schedule20 Jul 26 person by visibility 430 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  पर्यावरणवादी नेते आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये नीट पेपर बाबत व सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करत होते. सराकरने त्यांच्याकडे व कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून सोनम वागचुक यांना जबरदस्तीने उचलून दवाखान्यात भरती केले. त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आंदोलनामधील युवकांच्यावर  लाठी चार्ज करून अनेकांना जखमी केले. या सर्व गोष्टीचा निषेध  कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला. त्याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. सरकारने या विद्यार्थ्यांच्या व शिक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन  दडपून न टाकता त्याला योग्य प्रतिसाद देऊन आंदोलनकर्त्याशी चर्चा करावी. शिक्षणाचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत. आपल्या या दडपशाहीच्या धोरणामुळे देशभरामध्ये तरुणांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. याची दखल घ्यावी आणि हे विद्यार्थी, शिक्षण आणि तरुणांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना  दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळामध्ये खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे, शिक्षक नेते राजाराम वरुटे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंदकर, समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, उमेश देसाई, महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे नेते संतोष आयरे, संजय पाटील, मनोहर सरगर, शिवाजी भोसले, उत्तम कुंभार, कुमार पाटील संदिप सुतार, यशवंत पाटील गोरख वातकर सर्जेराव नाईक, दिलीप माने आदींचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes