Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी संपत पाटील, अमोल माने भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभारआंतरभारती शिक्षण मंडळ करणार महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभागफेरीवाल्यांचा सोमवारी महापालिकेवर मोर्चाकर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी विद्यापीठ प्रशासनासोबत कास्ट्राइब संघटनेची बैठकसर्व स्वयंसेवी संस्थांना सीएसआर निधी मिळावा; राज्यस्तरीय समन्वय प्राधिकरण स्थापण्याची मागणी आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन,  भाजपाचा जोरदार आक्षेपशक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !

जाहिरात

 

वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभार

schedule19 Jul 26 person by visibility 36 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील वकिलांच्या सुरक्षिततेसाठी विधिमंडळात महत्त्वपूर्ण विधेयक मांडल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने प्रत्यक्ष भेट घेऊन जाहीर आभार मानण्यात आले. वकिलांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, विधिमंडळात या संदर्भातील आवाज उठवल्याबद्दल वकिलांनी आमदार क्षीरसागर यांचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि प्रमुख वकीलांची उपस्थिती होती. यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष ॲड. संजय घाटगे, माजी अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील आणि ॲड. आर. एल. चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश होता.

तसेच जिल्हा बार असोसिएशनचे सहसचिव ॲड. अवधुत पाटील, स्टेट यंग लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. चेतन शिंदे, उपाध्यक्ष ॲड. अभिषेक देवकर, लोकल ऑडीटर ॲड. सर्वेश भांदिगरे आणि कार्यकारिणी सदस्य ॲड. वैभव गोरडे या प्रसंगी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने आमदार  क्षीरसागर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वकिलांच्या सुरक्षेचा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा, अशी अपेक्षाही  व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes