शिवसेना ठाकरे पक्षातर्फे सोनम वांगचुकांच्या लढ्याला पाठिंबा ! सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी ! !
schedule20 Jul 26 person by visibility 52 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर - ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ,संशोधक सोनम वांगचुक यांच्या लढयाला शिवसेना ठाकरे पक्षातर्फे पाठिंबा देण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, जोरदार निदर्शने करत केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच संविधान बचाव संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती केलेला एक युवक हातात संविधान घेऊन,संविधान बचाव चा उपदेश देणारा प्रसंग दाखवला गेला. तसेच या आंदोलनात सोनम वांगचूक यांच्या सरकार विरोधी या लढ्याला एकमताने पूर्ण पाठिंबा जाहिर केला. यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील, शिवसेना शहर प्रमुख मंजित माने, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुंरे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, स्मिता सावंत,राहूल माळी, दीपक गौड, विकी मोहिते, दिनेश साळोखे, विनोद खोत,केदार वाघापूरकर, शौनक भिडे, चैतन्य देशपांडे, शुभम पाटील, कनिष्क शिंदे, अक्षय घाटगे,आदित्य हुलजी,राज झांबरे,शुभांगी साळोखे, रणजित आयरेकर, दीपाली शिंदे, आणि ठोंबरे,सुप्रिया पाटील, रुपेश रोडे, दिलीप देसाई, सदाशिव पवार, सानिका दामूगडे, ममता पाखरे, पूर्वा जाधव, सॅम गायकवाड,तृप्ती विभुते, सिद्धी दामूगडे, भरत आमटे,ऋषी जोशी,सरदार टिप्पे, आदित्य दिसलें, यशराज ताकटे, रोहित हांडे, प्रथमेश देशिंगे आदींचा सहभाग होता.