+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Feb 24 person by visibility 6339 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: 
साडेसत्तावीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी आणि महसूल सहाय्यक असलेल्या क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
स्वप्नील वसंतराव घाटगे ( वय - ३९ वर्षे. पद - तलाठी, सजा जयसिंगपूर, ता.शिरोळ, रा. रुकडी, ता.हातकणंगले) आणि शिवाजी नागनाथ इटलावार (वय ३२ वर्षे, पद- महसुल सहायक, तहसीलदार कार्यालय शिरोळ, सध्या रा.कसबा बावडा,कोल्हापूर, मुळ रा. कुंडलवाडी, ता.बिलोली, जि.नांदेड) अशी लाच मागणाऱ्या दोघां संशयितांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. जयसिंगपूर येथील डवरी वसाहतीत असलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याबाबत केलेल्या अर्जाचे कामकाज हे तक्रारदार पाहत होते तक्रारदाराने प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्या संदर्भात तक्रार अर्ज हा जयसिंगपूर येथील तलाठी स्वप्निल घाटगे यांचेकडे दिला होता. सदर क्षेत्रफळ दुरुस्ती करून सात बारा उतारा मिळणेकरिता तलाठी घाटगे यांनी स्वतः आणि तहसीलदार शिरोळ तहसील कार्यालय येथील क्लार्क शिवाजी नागनाथ इटलावार यांच्याकरिता व खाजगी टायपिस्ट यांच्याकरीता तक्रारदाराकडे २७ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तसेच क्लार्क इटलावार यांनी तलाठी घाटगे यांनी सांगितलेप्रमाणे तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली आहे. पोलिसांनी लाच मागणीची खातरजमा करुन दोघां आरोपीं विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे, पोलीस अंमलदार अजय चव्हाण, विकास माने, पोलीस नाईक सुधीर पाटील, सचिन पाटील, पोलीस काॅन्स्टेबल संदीप पवार, सूरज अपराध, विष्णू गुरव यांनी कारवाईत भाग घेतला.