महादेवीसाठी सुरु असलेल्या लढ्याला कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाचा पाठिंबा
schedule02 Aug 25 person by visibility 274 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: – नांदणी येथील जैन मठाच्या हत्तीणी महादेवी हिला परत आणण्यासाठी सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठा लढा सुरु आहे. ही हत्तीण केवळ एका धर्माची नाही, तर कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानली जात आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने या लढ्याला आपला लढा मानत पाठिंबा देत असल्याचे मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी सांगितले. आजरेकर म्हणाले, ‘कोल्हापूर हे धार्मिक सहिष्णुतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. या भूमीवर कोणत्याही धार्मिक वारशाला धक्का लागेल, हे आम्हाला मान्य नाही. माधुरीसाठी सुरू असलेल्या या लढ्यात आम्ही पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहोत. ही लढाई केवळ एका प्राण्यासाठी नाही, तर कोल्हापूरच्या धार्मिक एकतेसाठी आहे. महादेवीला परत आणण्यासाठी रविवारी नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्रा निघणार आहे. दुपारी चार वाजता पदयात्रा कोल्हापूर शहरात तावडे हॉटेलजवळ पोहोचणार आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाने सहभागी व्हावे.’