Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोगसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे, व्हाईस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर कृष्णराज महाडिकांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक !

जाहिरात

 

यसबा बाल मित्र पुरस्कार प्रा. प्रज्ञा गिरी, आशिष घेवडे यांना जाहीर

schedule08 Dec 25 person by visibility 293 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर भूषण दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त यसबा करंडक आंतरशालेय कला महोत्सव शनिवारी (१३ डिसेंबर २०२५ ) रोजी होत आहे. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृह येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत  यसबा करंडक पार पडणार आहे. दरम्यान यानिमित्त भालकर फौंडेशनर्फे दिल्या जाणाऱ्या यसबा बालमित्र पुरस्कार २०२५ची घोषणा करण्यात आली आहे. यंदा, प्रा. प्रज्ञा गिरी  व सामाजिक चळवळीतील अशिष घेवडे यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती करंडकचे दिग्दर्शक संग्राम यशवंत भालकर यांनी दिली,

शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
  आंतरशालेय कला महोत्सव होत आहे. निबंध, मातीकाम,चित्रकला,रांगोळी, एकपात्री, समूहगीत, समूहनृत्य अशी स्पर्धा होणार असून १६ शाळांनी नावनोंदणी केली आहे. ३७५ विद्यार्थी कलाकार यात सहभागी घेणार आहेत, विजेत्यांना पारितोषिके व बक्षीसे प्रदान केली जातात. कला महोत्सवाचे हे ४ थे वर्षं आहे. उद्घाटन समारंभास उद्योजक संग्राम पाटील व तर अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक टी.एम.चौगुले असणार आहेत.

याप्रसंगी प्रा. डॉ. आर.व्ही गुरव , प्रा.कपिल राजहंस, हैमांग सोनी तर  बक्षीस समारंभ शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डाॅ.ज्योती जाधव, कुलसचिव व्ही.एन.शिंदे , अभिनेते प्रकाश धोत्रे, अभिनेते आनंद काळे, सिध्दराज विवेक शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पत्रकार परिषदेला फौंडेशनचे अध्यक्ष संदिप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव, चित्रकार बबन माने,समन्वयक भुषण पाठक, रितेश सुतार,मैथिली सरनाईक उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes