सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
schedule31 Jan 26 person by visibility 305 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : खासदार सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर खासदार सुनेत्रा पवार यांची राज्य मंत्रिमंडळात निवड करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी शनिवारी 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी मंत्रीपदाची व गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, माजी मंत्री नवाब मलिक आदी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची दुपारी बैठक झाली या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली सायंकाळी पाच वाजता सुरेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेतला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदी महिलेची निवड झाली. सुनेत्रा पवार या मंत्रीपदाची शपथ घ्यायला गेल्यानंतर उपस्थितांमधून "अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे, महाराष्ट्राचा एकच दादा अजितदादा अजितदादा " अशा घोषणा देण्यात आल्या. दहा मिनिटात हा शपथविधी समारंभ पार पडला.