सतेज पाटील समर्थक प्रदीप झांबरेंचा भाजपमध्ये प्रवेश ! मुडशिंगीत काँग्रेसला धक्का !!
schedule31 Jan 26 person by visibility 180 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राजकीय घडामोडी ही वेगावल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे समर्थक व करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे यांनी शनिवारी 31 जानेवारी 2026 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. याप्रसंगी प्रा. जयंत पाटील, गडमुडशिंगी येथील जिल्हा परिषदेचे उमेदवार तानाजी पाटील उपस्थित होते. प्रदीप झांबरे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते 2017 ते 2022 या कालावधी त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले होते. 2017 मध्ये ते निवडून आल्यानंतर करवीर पंचायत समितीचे सभापती झाले होते. झांबरे हे मुडशिंगी येथील आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत हा पक्षप्रवेश झाल्यामुळे काँग्रेसला धक्का मानला जात आहे.