Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी टीडीआरचा वापर, आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठकगोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवारजनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडेशहीद महाविद्यालयातील गोपिकांचा जल्लोष, डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडीटीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, विवेकानंद संस्थेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण समारंभविधी परीक्षेत धन्वंतरी पाटील शिवाजी विद्यापीठात प्रथमयुवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमणगणेशोत्सव... माय मराठीचा गजर अन पुस्तकाची निर्मिती ! छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची बातच न्यारी !!गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

schedule12 Sep 26 person by visibility 15 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महापालिकेच्या पीएमई बस सेवेंतर्गत प्राप्त झालेल्या ४० नवीन बसेसपैकी १२ मीटर मीटर अशा दोन अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची प्रत्यक्ष रस्ता चाचणी घेण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार ही चाचणी घेण्यात आली.

१२ मीटर बसची रस्ता चाचणी आरकेनगर येथील स्वयंभू गणेश मंदिर ते कसबा बावडा या मार्गावर घेण्यात आली. तसेच मीटर बसची चाचणी बोंद्रे नगर ते एस.टी. स्टँड, शाहू मैदान, राजारामपुरी मार्गे गंगावेश या मुख्य अंतर्गत मार्गावर घेण्यात आलीया प्रत्यक्ष चाचणी दरम्यान शहरातील विविध वाहतूक सिग्नल, संभाव्य वाहतूक कोंडीची ठिकाणे, बस थांब्यांवरील प्रवाशांचे चढणे-उतरणे, रस्त्यांची स्थिती तसेच स्पीड ब्रेकर्समुळे बसच्या संचालनावर होणारे परिणाम यांचा तांत्रिक व्यावहारिकदृष्ट्या सखोल अभ्यास करण्यात आला. बसची शहरातील विविध मार्गांवर सुरक्षित, सुरळीत प्रभावीपणे वाहतूक करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचे मूल्यमापन करण्यात आले.

या रस्ता चाचणीवेळी परिवहन सभापती  सत्यजित जाधव अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. त्यांनी बसमधून प्रवास करून विविध मार्गांवरील वाहतूक संचालनाची पाहणी केली तसेच आवश्यक सूचना दिल्या.बसची रस्ता चाचणी पूर्ण झाली असून, आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अधिकृत उद्घाटनानंतर या नवीन बससेवा लवकरच कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यावेळी सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, जेबीएमचे प्रतिनिधी सचिन साळुंखे, हंसा ऋषिकेश शिंदे, परिवहन विभागाचे चालक रविंद्र बोडके नितीन ढेरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes