राज्य महिला फुटबॉल संघात सोनाली साळवी, आर्या मोरे, सानिका पाटील निवड
schedule26 Mar 23 person by visibility 354 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने हिरो सिनियर वुमन्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप २५ मार्च पासून उत्तराखंड येथे सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघात कोल्हापूरच्या सोनाली साळवी, आर्या मोरे, सानिका पाटील यांची निवड झाली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेसाठी पाठविणेत येणारा महाराष्ट्र राज्य महिला फुटबॉल संघ जाहीर करणेत आला असून त्यामध्ये के.एस.ए. च्या वतीने पाठविणेत आलेल्या सोनाली जयवंत साळवी, आर्या धनाजी मोरे, सानिका काशिनाथ पाटील या खेळाडंची निवड झाली आहे. सोनाली साळवी ही न्यू कॉलेजची, आर्या मोरे आणि सानिका पाटील कमला कॉलेजच्या विद्यार्थीनी आहेत. आहेत. या खेळाडूंना संस्थेचे पेट्रन-इन्-चीफ् शाहू छत्रपती , पेट्रन् मेंबर माजी खासदार युवराज संभाजीराजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष - मालोजीराजे , ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या मधुरिमाराजे तसेच केएसएचे सचिव माणिक मंडलिक, सह सचिव राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले. सदस्य नितीन जाधव व प्रशिक्षक निखील कदम, अमित साळोखे, पृथ्वी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले होते.