Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गग डजजवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षित

जाहिरात

 

क्षयरोग विभागास अत्याधुनिक ट्रुनॅट मशीन प्रदान

schedule03 Apr 24 person by visibility 997 categoryआरोग्य

 मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते ट्रुनॅट मशीनचे उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर ग्रामीणसाठी राज्यस्तरावरुन नवीन सहा ट्रुनॅट मशीन प्राप्त झाली असून या मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहू हॉल येथे करण्यात आले.
 यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, पी. एस.एम. विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. कोतनीस, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.ए.पटेल  उपस्थित होते. यावेळी ट्रुनॅट मशीन मशीन क्षयरोग विभागास प्रदान करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयामध्येही मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते ट्रुनॅट मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, या मशीनचा वापर करुन कमी वेळेत क्षयरोगाचे निदान करुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये टिबी मुक्त ग्रामपंचायत अभियान राबवावे. यावेळी त्यांनी क्षयरुग्ण दत्तक घेऊन स्वतः निक्षय मित्र बनणार असल्याचे जाहीर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी व समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, संस्था यांनी निक्षय मित्र बनून क्षयरुग्ण दत्तक घ्यावेत, असे आवाहनही यावेळी केले.
हे मशीन कोल्हापूर मधील सर्व तालुक्यात मुख्य आरोग्य संस्थेत लावण्यात येणार आहे. खासगी संस्थेत ही तापसणी दोन ते अडीच हजारात होते तथापि शासकीय संस्थेत ही तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येते. तसेच या तपासणीतुन प्रथम टप्प्यातील टीबी निदानाबरोबरच पुढील टप्प्यातील एम.डी. आर. निदान त्याच वेळी करण्यात येते. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी ट्रुनॅट मशीन हे दोन तासांमध्ये क्षयरोगाचे निदान करते, यामुळे रुग्णास लवकर उपचारावर आणून बरे करता येते. त्यामुळे त्या रुग्णापासून होणारा पुढील प्रसार थांबतो, अशी माहिती दिली. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी  संभाजी मोरे यांनी ट्रुनॅट मशीनच्या कार्यप्रणालीबद्दल माहिती दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes