Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयुष्यात कला जोपासा - पंडित विनोद डिग्रजकर शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य, नामविस्ताराचा प्रयत्न झाल्यास कोल्हापुरी हिसकानामविस्तारासाठी सतरा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाविद्यार्थ्यांनी स्वतःमधील गुण कौशल्य ओळखून स्वतःसह समाजाचा विकास करावा -डॉ.संपत खिलारेसाळोखेनगर डीवायपीमध्ये रक्तदान, शंभरहून अधिक बाटल्या रक्त संकलनविद्यापीठाची स्थापना, बाळासाहेब देसाईंचा खमकेपणा, सरकारची कमिटी अन् नावावर शिक्कामोर्तब !महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालीप्रा . उदय आनंदराव पाटील यांना पीएचडी जाहीरयड्रावमधील बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी अजिंक्य,अभय भोसले उपविजेता आनंदी जीवनासाठी वाईटाचा त्याग अन् चांगल्याचा स्वीकार करा : इंद्रजित देशमुख

जाहिरात

 

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलनात जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार

schedule31 Mar 24 person by visibility 501 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलनात १०० टक्के उद्दिष्ट पुर्तता केल्यामुळे या वर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला असून कोल्हापूरचे सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. परवेज पटेल यांनी हा पुरस्कार नुकताच स्वीकारला.
    पुणे सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) डॉ. सुनिता गोल्हाईत, मुंबई, हिंद कुष्ठ निवारण संघ वडाळाचे संचालक उदय ठकार, मुंबई अलर्ट इंडीयाचे संचालक डॉ. अँथोनी स्वामी यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन नुकताच पुरस्कार देण्यात आला.
कोल्हापूर जिल्हयासाठी २०२२-२३ व २०२३-२४ या दोन्ही वर्षी हा पुरस्कार मिळाल्यामुळे ही बाब अभिमानाची आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.व्ही. भोई , ए.एन.शास्त्री, आर.के.पवार यांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत चालू आर्थिक वर्षात नविन कुष्ठरुग्ण शोध, कार्य, उध्दिष्टांची पुर्तता तसेच विकृती दर्जा २ चे प्रमाण व चाईल्ड रुग्णांचे प्रमाण कमी आहे. तसेच विकृती असलेल्या रुग्णांना भौतिकोपचार व त्याना आवश्यक असलेल्या सेवा १०० टक्के पुरविण्यात आलेल्या आहेत.
यासह सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे यांनी कोल्हापूर जिल्हयाची राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिलेल्या निर्देशांकानुसार उद्दीष्टांची १०० टक्के पुर्तता केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.
कुष्ठरोग कार्यक्रमाचा तालुका स्तरावर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियमित आढावा, कुष्ठरोग शोध अभियान, स्पर्श जनजागृती अभियान इत्यादी उपक्रम कुष्ठरोग कार्यक्रमामध्ये चांगल्या पध्दतीने राबविल्यामुळे पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती डॉ. पटेल यांनी दिली

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes