Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत कृती समिती आक्रमकविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द- चिकाटी- शिस्त व आत्मविश्वास या चतुःसूत्रीचा वापर करावाहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर सामाजिक उपक्रम दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी - शरद पवार गटाचे निरीक्षक विकास लवंडेकोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढालहसन मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करू यागवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे- प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर गोकुळच्या दुधाची विक्रमी विक्री, गुढीपाडवा-रमजान ईदला मिळून 43 लाख लिटरची विक्री जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेशअधिकाऱ्यांना शिवीगाळ- महापालिकेत शडडू, सभागृहाला न शोभणारी मर्दुमकी ! नगरसेवकांच्या कृत्यामुळे, नेत्यावर माफीची वेळ ! !

जाहिरात

 

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द- चिकाटी- शिस्त व आत्मविश्वास या चतुःसूत्रीचा वापर करावा

schedule23 Mar 26 person by visibility 12 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  कष्टाशिवाय जीवनात यश मिळत नाही. त्यामुळे संकटांना संधी समजून जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त व आत्मविश्वास या चतुःसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन गोवा राज्य लोकसेवा आयोगाचे चेअरमन डॉ. उदयसिंह रावराणे यांनी केले. ते महाराष्ट्र शासन 'आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार' प्राप्त श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील हे होते. संस्थेचे चेअरमन  पाटील म्हणाले  'न्यू कॉलेज हे राजर्षी शाहू महाराजांचा विचाराचा वारसा जपणारे शैक्षणिक संकुल आहे. गुणवंत विद्यार्थी हे महाविद्यालयाचे वैभव असतात. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास होतो. खेळाडूंनी खेळाबरोबरच आपल्या शैक्षणिक गुणवत्तेकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच पालकांचा व शिक्षकांचा आदर करावा.'

 महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.व्ही.एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा विभाग प्रमुख, प्रा. अमर सासने यांनी वर्षभरात प्राविण्य मिळविलेल्या विद्याच्यांचे अहवालवाचन केले.  संस्थेचे व्हाइस चेअरमन डी.जी. किल्लेदार, खजाननीस  वाय.एस. चव्हाण, संचालक प्रा. विनय पाटील, डॉ.पी.के.पाटील, वाय.एल. खाडे, आजीव सेवक उदय पाटील, महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य यु.आर आतकिरे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.आर.एस. आडनाईक, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य, प्रा.डॉ.एस.जी. जगताप, महाविद्यालयाच्या प्रबंधक श्रीमती एम. वाय. कांबळे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते   डॉ. सर्जेराव पाटील, प्रा.श्रीमती यु.के. गायकवाड. प्रा.श्रीमती डॉ.एम.ए. नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी आभार मानले. 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes