Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर - सांगलीसह चार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईआषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय मदत पथक सज्ज, औषध किटसह पथक आळंदीसाठी रवाना!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम, विद्यार्थिनींच्या कलागुणांना लाभले व्यासपीठमहाराष्ट्र चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात, मुख्यमंत्र्यांनी केले गाव तिथे उद्योजक उपक्रमाचे कौतुक श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्रश्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटपकरवीर पंचायत समितीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देणार - साताप्पा पाटीलचाळीस वर्षे सेवा..कॉलेजवरील गेटवरचा शेवटचा निरोप…शिपाई मामांनी मारली सचिवांना मिठीकिरीट सोमय्या ना आमदार- ना खासदार, महापालिकेत येऊन बैठक घेण्याचा त्यांना काय अधिकार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोलप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएचडी

जाहिरात

 

कोल्हापूर - सांगलीसह चार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

schedule08 Jul 26 person by visibility 28 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार नियमबद्ध आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सरकारने निर्धारित केलेल्या कायदेशीर तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी करण्यात येणार आहेया निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे कोल्हापूर मंडळही कार्यरत असून, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे.

कोल्हापूर मंडळात बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत एकूण हजार ३६० खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर६७०, सांगली४५८, रत्नागिरी१४६ आणि सिंधुदुर्ग८६ रुग्णालयांचा समावेश आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तरावर विशेष तपासणी पथके असतील. ही पथके प्रत्येक रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करणार आहेत.

 तपासणीदरम्यान रुग्णालयामध्ये रुग्णशुल्क इतर सेवा शुल्काचे दरपत्रक दर्शनी भागात लावले आहे का, रुग्ण हक्क संहिता ठळकपणे प्रदर्शित केली आहे का, फायर ऑडिट पूर्ण आहे का, तसेच इतर आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची विशेष तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, आवश्यक सुविधांचा अभाव, खोटी माहिती, बेकायदेशीर कामकाज किंवा रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थांविरुद्ध प्रशासकीय कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई कोणत्याही संस्थेला त्रास देण्यासाठी नसून राज्यातील नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि नियमबद्ध आरोग्यसेवा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. सर्व खासगी रुग्णालयांनी नियमांचे काटेकोर पालन करून तपासणी प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes