+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Sep 22 person by visibility 427 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सतरा सप्टेंबर २०२२ ते दोन ऑक्टोबर २०२२ या सेवा पंधरवडा कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी विशेष कँम्पचे आयोजन केले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली आहे.
 कोल्हापूर जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतिस्वाक्षरीने प्रस्ताव सादर करावेत असे म्हटले आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी स्विकारण्यात येणार आहेत. तालुकानिहाय नियोजन केले आहे. यामध्ये कोल्हापूर शहरासाठी चेतना विकास मंदिर शेंडा पार्क, करवीर तालुक्यासाठी वि.म.लोहिया मूकबधिर शाळा न्यू महाद्वार रोड, शिरोळसाठी नवजीवन हायस्कूल जयसिंगपूर येथे सोय केली आहे. इचलकरंजी शहरासाठी गोविंदराव हायस्कूल इचलकरंजी, हातकणंगले तालुक्यासाठी बळवंतराव यादव हायस्कूल पेठवडगाव, गडहिंग्लज, आजरा व चंदगडसाठी माध्यमिक शिक्षक सेवकांची पतसंस्था गडहिंग्लज डॉक्टर कॉलनी येथे सोय आहे.
कागल तालुक्यासाठी स्वर्गीय गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल, भुदरगडसाठी पी. बी.पाटील माध्यमिकव ज्युनिअर कॉलेज मुधोळ, राधानगरीसाठी नागेश्वर हायस्कूल राशिवडे बुद्रुक, गगनबावडासाठी दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय तिसंगी तर पन्हाळा व शाहूवाडीसाठी महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथे सोय प्रस्ताव स्वीकाण्याची सोय केले आहे.