Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकरकोल्हापुरात मंगळवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनविवेकानंद संस्थेकडून ४४ हजार फॉर्म जमा, चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कौस्तुभला तिकीट अन् विजयही निश्चितस्थायी समितीत पाठपुरावा, ४३३ ग्रामपंचायतीला मिळाले आर्थिक खर्चाचे अधिकारविवेकानंद शिक्षण संस्था ठरवेल तोच  पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार असेल - मंत्री चंद्रकांत पाटीलन्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय एक राखी सीमेवरील जवानांसाठी,  स्वामी विवेकानंद ट्रस्टचा उपक्रमआर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यशजिल्हा परिषदेत सदभावना दिनानिमित्त अधिकारी -कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ  उद्योगरत्न पुरस्कार सोहळयात सचिन शिरगावकरांनी सांगितली यशाची चतु:सूत्री

जाहिरात

 

शहाजी महाविद्यालयात रंगले श्रावणधारा कवी संमेलन

schedule12 Aug 24 person by visibility 805 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात सोमवारी श्रावणधारा कवी संमेलन उत्साहात  झाले.  पस्तीसहून अधिक प्राध्यापक,विद्यार्थ्यांनी या कवी संमेलनामध्ये सहभाग नोंदवून उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या.या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण हे होते. मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग, शिवाजी ग्रंथालय आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त श्रावणधारा हे कवी संमेलन झाले.
   प्रारंभी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य  शानेदिवाण व सहाय्यक ग्रंथपाल यु. यु. साळोखे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य शानेदिवाण म्हणाले, कविता हा उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार आहे. कवितेला लय असतो, हुंकार असतो, ताल असतो, रिदम असतो.सौंदर्याचा लयबद्ध अविष्कार म्हणजे कविता असते. कवितेत निर्व्याज प्रेम असते. मानवी जीवनामध्ये व्यक्ती क्रांती करू शकते, प्रेम करू शकते अथवा ती रूक्ष राहू शकते. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ही बालकवींची कविता तसेच संदीप खरे यांची पाऊस , गुरु ठाकूर यांची कातरवेळी बसलो होतो, कवी सौमित्र यांच्या कवितांचे वाचनही त्यांनी यावेळी करून दाखवले. 
   या काव्य संमेलनात मराठी, हिंदी इंग्रजी विषयातील पाऊस, निसर्ग, श्रावण या विषयावरील मान्यवर कवींच्या आणि स्वतः तयार केलेल्या कवितांचे वाचन नवोदित कवींनी केले.  श्रुती संजय कुरणे, राजश्री पांडुरंग शेळके, अर्पिता अजय साबळे, संतोष सोनबा शेळके, श्रावणी बुरसे, ऋतिका माने,समीर बारे, भागोजी वरख, सादिया बागवान, फतीमा सय्यद, अमृता माने, तराना पेरवे, पायल जाधव या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. तसेच प्रा. डॉ.के एम देसाई, डॉ.सारिका कांबळे,  प्रा. अमर शेळके, डॉ विजय देठे, डॉ शोभा चाळके, प्रा. ऐश्वर्या हिंगमिरे,  प्रा. अक्षय भोसले, डॉ रचना माने, प्रा. अस्मिता इनामदार, डॉ एस एस पाटील यांनी उत्स्फूर्तपणे कवितांचे सादरीकरण केले. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पल्लवी कोडक, डॉ. एन. एस. जाधव, डॉ. एस एस पाटील यांनी संयोजन केले.  प्रा.पी.के.पाटील यांनी  सूत्रसंचालन केले. डॉ.रचना माने यांनी आभार मानले. 
   यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे.,डॉ शिवाजी जाधव, डॉ. एस. एस राठोड  उपस्थित होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंगराव बोंद्रे यांचे  मार्गदर्शन मिळाले. यावेळी कवितांवरील ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्तीची शपथ देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes