शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत, जुना बुधवार पेठ पराभूत
schedule28 Mar 23 person by visibility 346 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने यजमान संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघावर १-० असा निसटता विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाने शिवाजी तरुण मंडळाला कडवी झुंज दिली. पूर्वार्धात शिवाजीने आक्रमक चढाया केल्या. पण जुना बुधवारने भक्कम बचाव केला. मध्यंत्तरास गोलफलक कोरा होता. उत्तरार्धात ८५ व्या मिनिटाला योगेश कदमने हेडद्वारे गोल करत शिवाजीला आघाडीस नेले. हीच आघाडी कायम टिकवत शिवाजीने १-० अशा गोलफलकाने विजय संपादन करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. शिवाजीकडून योगेश कदम, संदेश कासार, करण चव्हाण बंदरे, रोहन आडनाईक, इंद्रजीत चौगुले यांचा तर जुना बुधवारकडून रवीराज भोसले, रिचमॉन्ट अवेटी, हरिष पाटील, सचिन मोरे, प्रकाश संकपाळ यांचा चांगला खेळ झाला. शिवाजीच्या योगेश कदमची उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर जुना बुधवारचा गोलरक्षक अब्दुल्लाह अन्सारी याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
बुधवारचा सामना-
प्रॅक्टिस फुटबॉल क्लब वि. बीजीएम स्पोर्टस्, दुपारी ४ वा.