नंदवाळ दिंडीत वारकऱ्यांना गोकुळतर्फे सुगंधी दूध- हरीपाठ वाटप
schedule07 Jul 25 person by visibility 136 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापूर ते नंदवाळ मार्गावरील पायी दिंडीत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत सुगंधी दूध आणि हरीपाठ पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते या पायी दिंडीचे औचित्य साधून दिंडीतील भाविकांना गोकुळच्यावतीने ५ हजार सार्थ हरिपाठ पुस्तिका वितरीत केल्या. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, संभाजी पाटील, संचालिका शौमिका महाडिक उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, नंदवाळ दिंडीत दरवर्षी हजारो वारकरी सहभाग घेतात. गोकुळतर्फे आम्ही त्यांच्यासाठी दिलेले दूध आणि हरीपाठ हे केवळ सेवा नव्हे, तर आमचं भक्तीभावातून केलेलं योगदान आहे. शेतकरी हे गोकुळचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं हित आणि समाजाची सेवा हेच गोकुळचं खऱ्या अर्थाने काम आहे.
या कार्यक्रमप्रसंगी संघाचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, महिला नेतृत्व अधिकारी मृण्मयी सातवेकर, संपदा थोरात उपस्थित होते.