+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजयश्री जाधवांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले, त्यांनी पक्ष सोडणे अशोभनीय- आमदार सतेज पाटील adjustदिवाळीत कोल्हापुरात राजकीय धमाका, काँग्रेसचा आमदार शिवसेनेत adjustआमदार जयश्री जाधव शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत होणार प्रवेश ! राजेश क्षीरसागरही रवाना !! adjustराजेश क्षीरसागरांच्या विजयासाठी जीवाचे रान करू -भाजपा पदाधिकाऱ्यांची ग्वाही adjustजिल्हा परिषद कृषी विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या adjustदीपावलीनिमित्त जिल्हा परिषदेला चार दिवस सुट्टी adjustडीवाय पाटील अभियांत्रिकीत एनपीटीईएल जागरूकता कार्यशाळा adjustविधानसभेसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक, सतेज पाटलांचा समावेश adjustबंडखोरीची भाषा करणारे वीरेंंद्र मंडलिक उतरले मुश्रीफांच्या प्रचारात, म्हणाले विजयासाठी जीवाचे रान करू adjustचंद्रदीप नरकेंचे शक्तीप्रदर्शन, जंगी रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल
1001157259
1001130166
1000995296
schedule15 May 24 person by visibility 908 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शासकीय कामकाज गतीमान बनावे, निर्णय प्रक्रियेला विलंब लागू नये म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने ई - ऑफिस प्रणालीा अवलंब करण्यात येणार आहे. एक जून २्०२४ पासून या प्रणालीचा जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभागात वापर होणार आहे. प्रायोगिक तत्वावर मुख्यालयातील सर्व विभागामध्ये प्रात्यक्षिक नस्ती तयार करण्याचे कामकाज पंधरा ते ३१ मे या कालावधीत सुरु राहणार आहे. तसेच या कालावधीमध्ये टिपणी व प्राप्त पत्रांचे ई ऑफिस व प्रत्यक्ष नस्ती मध्ये तयार करण्याचे कामकाज सुरु आहे.  ई आूॅफिस प्रणालींद्वारे फायलींचा प्रवास उलगडणार असून दफ्तर दिरंगाई समोर येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कामकाजात संगणकाचा जास्तीत जास्त वापर करुन शासकीय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज व माहिती सुरक्षित, आणि जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी हा मुुख्य उद्देश आहे. त्यानुसार एखादा अर्ज निवेदन, प्रस्ताव आल्यानंतर त्याची ई ऑफीस प्रणालीमध्ये ई फाईल निर्माण करुन ती त्या त्या टेबलावरील कर्मचाऱ्याकडे संगणकाद्वारे पाठवली जाईल.
त्याला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करुन जोडली जातील आणि त्याबाबतचे अभिप्राय संगणकावर नोंदवून विभागप्रमुखांच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे पाठवली जाईल. या प्रक्रियेमध्ये नस्ती तयार झाले पासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पर्यंतचा नस्तीचा प्रवास तारीख व वेळेनुसार पाहता येतो. त्यामुळे कोणाकडे फाईल आहे, ती पूर्ण झाली अगर कसे याबाबत शोध घेणे शक्य होईल. तसेच नेमक्या कोणत्या कार्यासनावर नस्ती थांबून राहिली आहे याचीही माहिती मिळेल. अगदीच अत्यावश्यक असलेल्या फाईल्स च्या बाबतीत एखादे अधिकारी / कर्मचारी फिरतीवर असतानादेखील ई ऑफिसच्या च्या माध्यमातून कामकाज करु शकेल.
 ई ऑफिसमध्ये तयार झालेल्या नस्तीचे जतन ऑनलाईन होणार आहे त्यामुळे नस्ती नष्ट होणेचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच भविष्यामध्ये लागणाऱ्या नस्तीचे कागदपत्रेही वेळोवेळी उपलब्ध होण्यास सुलभ होणार आहेत. या प्रणालीमुळे कोणतीही नस्ती पूर्वलक्षी प्रभावाने तयार करता येणार नाही अथवा त्यात बदल करता येणार नाहीत. या प्रणालीमुळे कोणत्याही अभ्यंगातास/लाभार्थ्यास प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नाही. नस्तीच्या प्रवासामध्ये एकदा कर्मचाऱ्यांने नस्ती त्यांच्या लगतच्या वरिष्ठांकडे पाठविल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही ही बाब अत्यंत महत्वाची आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना  ई ऑफिससाठी आवश्यक असलेले शासकीय ई-मेल आयडी तयार करणेत आले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना मास्टर ट्रेनरद्वारे  प्रशिक्षण दिले आहे. 
       या दरम्यान कामकाज करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणेसाठी मास्टर ट्रेनरची नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे नव्याने सुरु होणाऱ्या नस्ती हया ई ऑफिस मधून प्रस्तावीत करणेची कार्यवाही  पंधरा मे पासून सुरु झाली आहे. एक जून २०२४ पासून जिल्हा परिषद मुख्यालयात नव्याने तयार होणा-या सर्व नस्ती ई ऑफिस प्रणालीमध्ये तयार केल्या जातील. ई ऑफिस प्रक्रियेमधून नस्ती पाठविण्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांनी या प्रक्रियेचा अवलंब करुन नस्ती मान्यतेस्तव सादर केल्या आहे.