हज यात्रेसाठी जाणार्या ३१९ भाविकांना लसीकरण
schedule14 May 24 person by visibility 292 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हयातून यंदा ३१९ मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जाणार आहेत. या यात्रेकरूंच्या लसीकरणाचा कार्यक्रम आज मंगळवारी पार पडला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सीपीआरच्या वैद्यकीय अधिकार्यांनी लसीकरण केले.
दरम्यान राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी कोल्हापुरला भेट देवून, भाविकांना मार्गदर्शन केले. यंदा भाविकांच्या सोयीसाठी सुविधा अॅपची निर्मिती केली आहे. त्याद्वारे हज यात्रेदरम्यान येणार्या अडचणी भाविक सोडवू शकतात, असे काझी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर जिल्हयातून यावर्षी ३१९ मुस्लिम भाविक हजयात्रेला जाणार आहेत. या यात्रेकरूंना हज प्रवासादरम्यान आणि यात्राकाळात करावयाच्या विधीबाबत मार्गदर्शन करण्यात येते. लिम्रास फौंडेशन आणि हज फौंडेशन यांच्यावतीने आज या भाविकांना सीपीआरमध्ये लसीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा कार्यक्रम झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पथकाने लसीकरण केले. त्यानंतर मुस्लिम बोर्डींगमध्ये हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी या शिबिराला भेट देवून भाविकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील २७ हजार भाविकांनी हजयात्रेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे २० हजार यात्रेकरूंची निवड कमिटीमार्फत झाली आहे. हे यात्रेकरू दोन ते सहा जून या कालावधीत मुंबईवरून हजयात्रेसाठी रवाना होतील. त्यासाठी लिम्रास फौंडेशन आणि हज फौंडेशनतर्फे मुंबईपर्यंत वाहनांची मोफत सोय दरवर्षी करण्यात येते.
यावर्षी यात्रेकरूंसोबत कोल्हापुरातील दोन सेेवेकरींची निवड करण्यात आली आहे, असे इम्तियाज काझी यांनी सांगितले. हज यात्रेच्या काळात सौदी अरेबियामध्ये असलेल्या भाविकांना कोणतीही समस्या येवू नये, यासाठी हज कमिटी ऑफ इंडियाने सुविधा अॅप हे नवं अॅप सुरू केले. या अॅपचा वापर करून यात्रेकरू आपल्या समस्यांचं निराकरण करू शकतील, असेही काझी यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला हज कमिटीचे जुबेर अहमद, हाजी इकबाल देसाई, समीर मुजावर, इम्तियाज बारगीर उपस्थित होते