महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.ऋतुराज रामचंद्र कुळदीप यांच्या द ख्रिश्चन अलगरी इन मिडल अर्थ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .के. शानेदिवाण, आय. क्यू. ए.सी.समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, लेखक डॉ.ऋतुराज कुलदीप यांची हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकाबाबत डॉ. ऋतुराज कुळदीप म्हणाले, भाषेवर धर्माचा प्रभाव कसा पडतो आणि त्याचा संशोधकीयरित्या खुलासा कसा करता येऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. या पुस्तकात इंग्रजी भाषेतील रूपकात्मक पद्धतीबद्दल संशोधनात्मक विवेचन केलेले आहे. इंग्रजी भाषेत संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरणार आहे.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, ऋतुराज कुळदीप यांचे हे पुस्तक संशोधकांना, अभ्यासकांना, वाचकांना मार्गदर्शक असे आहे. त्यांचे हे पहिलेच पुस्तक असल्याने त्यांचे विशेष कौतुक आहे. नवनवीन लेखकानी आपले संशोधन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.