+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजयश्री जाधवांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले, त्यांनी पक्ष सोडणे अशोभनीय- आमदार सतेज पाटील adjustदिवाळीत कोल्हापुरात राजकीय धमाका, काँग्रेसचा आमदार शिवसेनेत adjustआमदार जयश्री जाधव शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत होणार प्रवेश ! राजेश क्षीरसागरही रवाना !! adjustराजेश क्षीरसागरांच्या विजयासाठी जीवाचे रान करू -भाजपा पदाधिकाऱ्यांची ग्वाही adjustजिल्हा परिषद कृषी विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या adjustदीपावलीनिमित्त जिल्हा परिषदेला चार दिवस सुट्टी adjustडीवाय पाटील अभियांत्रिकीत एनपीटीईएल जागरूकता कार्यशाळा adjustविधानसभेसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक, सतेज पाटलांचा समावेश adjustबंडखोरीची भाषा करणारे वीरेंंद्र मंडलिक उतरले मुश्रीफांच्या प्रचारात, म्हणाले विजयासाठी जीवाचे रान करू adjustचंद्रदीप नरकेंचे शक्तीप्रदर्शन, जंगी रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल
1001157259
1001130166
1000995296
schedule16 May 24 person by visibility 239 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :   येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर उभारलेल्या एक्स्पोमध्ये  रेड गोल्ड फिश,ऑस्कर, सिल्व्हर गोल्ड, ब्लॅक गोल्ड, फिराना, टँटरा,लेझर, शार्क,कोईकर, अँलीगेटर, आरफामा आदी माशांच्या प्रजाती पाहावयास मिळत आहेत.याठिकाणी उभा करण्यात आलेला माशांचा हा बोगदा साधारण ८० फूट रुंद व २०० फूट लांब असा उभारलेला आहे. सअशी माहिती एक्सपोचे मॅनेजर जयराज यांनी दिली.
 सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत मनोरंजनाच्या कार्यक्रमाची वेळ आहे.र्वांच्याच मनोरंजनासाठी विविध आकर्षक खेळ आणि खाद्य व पेय यांची दुकाने आहेत.तरी कोल्हापूरकरांनी या मनोरंजननगरीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. 
पहिल्यांदाचं वातानुकूलित पाण्याखालील बोगद्यामध्ये मासे बसवण्यात आले आहेत. पाच वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. 
संपूर्ण जगातील विविध प्रकारच्या जिवंत माशांचे प्रदर्शन कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच सुरू केले आहे. दुबई शहराप्रमाणेच कोल्हापूर शहरात वातानुकूलित पाण्याखालील बोगदा तयार केला आहे. हे सर्व मासे काचेच्या मोठ्या अँक्वेरीमध्ये आहेत. २४ तास माशांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो.उन्हाळ्यात सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी बागा, मैदाने अपुरी पडतात. ऊन खाली झाल्यानंतर या मुलांना कधी आम्ही खेळणार असे वाटत असते
म्हणूनच कोल्हापूरच्या मातीत मुलांच्या भेटीला आयर्विन ख्रिश्चन मैदानात एक्स्पो आला आहे. या एक्स्पोमध्ये जगभरातील विविध जातींच्या रंगीत जिवंत माशांच्या अनेक प्रजाती आपल्या कोल्हापूर शहरात पाहण्यास मिळत आहेत.तरी ३ जून पर्यंत सुरू राहणाऱ्या या अंडर वॉटर टनेल एक्सपो कोल्हापूरकरांना अवश्य पहावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.यावेळी राहुल इस्लाम, शाहिद बारगीर, एजेस पटेल, महेश चक्रवर्ती,गजानन मोटे आदी उपस्थित होते.