भाजपाकडे शेकडो इच्छुकांचे अर्ज, मुलाखतीनंतर प्रभागात सर्व्हेक्षण !
schedule14 Dec 25 person by visibility 222 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात मुलाखती झाल्या. खासदार धनंजय महाडिक,पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली. रविवारी, १४ डिसेंबर रोजी एक ते सतरा प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या प्रभागातून ३०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी मागणी केली. वीस प्रभागातील मुलाखती पार पडल्यानंतर इच्छुक उमेदवारांचे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतरच पुढील निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. मुलाखती दरम्यान, प्रत्येक इच्छुक उमेदवाराची ओळख, त्यांच्या प्रभागातील सद्यस्थिती याबद्दल माहिती जाणून घेण्यात आली. प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पहिल्या दिवशी स्थायी समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक आशिष ढवळे, राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, निलेश देसाई, पल्लवी देसाई, संजय निकम, दिलीप पोवार, सरस्वती पोवार, उमा इंगळे, रुपाराणी निकम, किरण नकाते, माधुरी नकाते, सुभाष रामुगडे, विजय खाडे, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे आदींनी मुलाखती दिल्या. याशिवाय विशाल शिराळे, विजय अग्रवाल, अजिंक्य अशोक जाधव, गिरीश साळोखे, प्रसाद जाधव, रोहित भाले, विश्वजीत पवार, रतन पचेरवाल, परवेश पठाण, धीरज पाटील, धनश्री तोडकर, शैलेश पाटील, विद्या बागडी, अतुल चव्हाण आदींच्या मुलाखती झाल्या.