अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने, अन्यथा गुरुवारपासून कामबंद आंदोलन
schedule11 Feb 26 person by visibility 8 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजना बाह्य कामांची सक्ती करू नये यासह अन्य मागण्यसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे मंगळवारी, दहा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. संघटनेच्या शिष्टमंडळाने, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी निवेदन दिले.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, सचिन शुभांगी पाटील, रंजना कांबळे, जयश्री पवार, अनिता बचाटे, सुनंदा काटकर, जयश्री बंगडे, करुणा धेंडे, दिलदार मुजावर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास गुरुवारपासून, (१२ फेब्रुवारी २०२६) बेमुदत बंदचा इशारा संघटनेने दिला आहे.