सतेज पाटलांचा एकहाती विजय ! महायुतीला जोर का झटका !!
schedule19 Oct 26 person by visibility 32 categoryउद्योग
या निवडणुकीमध्ये महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक , आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक , आमदार शिवाजी पाटील अशी साऱ्या नेत्यांची मोट बांधण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने एकाकी झुंज देत गोकुळ वर सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत गोकुळ मधील मातब्बर मंडळींना धक्का बसला. गोकुळचे माजी चेअरमन व गेली कित्येक वर्षे गोकुळ मध्ये संचालक व चेअरमन म्हणून काम केलेले विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांना पराभवाची चव चाखावी लागली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र व माजी चेअरमन नविद मुश्रीफ यांनाही ओबीसी गटातून पराभवाला सामोरे जावे लागले.ओबीसी गटामध्ये शशिकांत खोत यांनी नवीद मुश्रीफ यांचा पराभव केला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीतून विजयी झालेले उमेदवार सर्वसाधारण गटातून शशिकांत पाटील चुयेकर, अभिजीत तायशेटे, प्रा. किसन चौगुले, बाबासाहेब चौगुले, राहुल देसाई विद्याधर गुरंबे, बाबासाहेब देवकर, सचिन घोरपडे, विश्वजीत दिनकरराव जाधव हे उमेदवार विजयी ठरले. महिला गटातून अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, ओबीसी गटातून शशिकांत खोत, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून बयाजी शेळके, अनुसूचित जाती जमाती गटातून राजूबाबा आवळे विजयी झाले. महायुतीकडून 11 उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये राहुल पी एन पाटील, माजी आमदार राजेश पाटील , अजित नरके , चेतन नरके , अंबरीश घाटगे, रणजीत के पी पाटील, रणजीत दिलीप पाटील, वीरेंद्र मंडलिक, मदन देसाई, युवराज पाटील, अजित पाटील विजयी झाले. गोकुळ दूध संघ निवडणुकीतील 25 विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे :
अभिजित प्रभाकर तायशेटे — २,०८०, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर — २,०४5 , राहुल पांडुरंग पाटील — १,९७३, चेतन अरुण नरके — १,९६६, अजित शशिकांत नरके — १,९२४, किसन बापूसो चौगले — १,९०३, अंबरीषसिंह संजय घाटगे — 1877, बाबासाहेब श्रीपती चौगले — १,८२८, राहुल बजरंग देसाई — १,८१८, विद्याधर बाबूराव गुरबे — १,८०९, विरेंद्र संजय मंडलिक — १,७९८, मदन बाबुराव देसाई — १,७९७, बाबासाहेब विष्णू देवकर — १,७९४, राजेश नरसिंगराव पाटील — १,७७७, रणजितसिंह दिलीपराव पाटील — १,७७६, रणजितसिंह कृष्णराव पाटील — १,७४६, अजित पांडुरंग पाटील — १,७१८, सचिन दौलतराव घोरपडे — १,७०२, विश्वजीत दिनकरराव जाधव — १,६८७, युवराज दत्ताजीराव पाटील — १,६८७.
राखीव गटातील उमेदवार महिला राखीव गट: अंजना केदारी रेडेकर , भाग्यश्री धीरज डोंगळे . इतर मागासवर्गीय गट: शशिकांत शामराव खोत , अनुसूचित जाती गट: राजू बाबा आवळे , भटक्या-विमुक्त जमाती गट: बयाजी शेळके