तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर, समविचारीचे सहा उमेदवारांची मुसंडी
schedule19 Oct 26 person by visibility 244 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तिसऱ्या फेऱ्या आहेत सर्वसाधारण गटातील 20 जागांपैकी महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत तर समविचारी आघाडीतील सहा उमेदवारांनी मुसंडी मारली आहे.
महायुतीचे अशोक चरटी, प्रताप पाटील कावणेकर, एस आर पाटील, अमर पाटील, अरुण डोंगळे, कर्णसिंह गायकवाड हे उमेदवार पिछाडीवर आहेत तर समविचारी आघाडीचे सर्वसाधारण गटातील शशिकांत पाटील- चुयेकर, विद्याधर गुरुबे, बाबासाहेब चौगले,किसन चौगले, राहुल देसाई, अभिजीत तायशेटे हे आघाडीवर आहेत.