वेसरफमध्ये दहा एकर परिसरात साकारतेय आजरीज इको व्हॅली
schedule25 Mar 23 person by visibility 325 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : निसर्ग संवर्धन आणि निसर्गाच्या विविध रूपांचा पर्यटकांना अनुभव देण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील वेसरफ येथे आजरीज इको व्हॅली साकारत आहे. मंगळवारी (२८ मार्च) या इको व्हॅलीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती उद्योजक शेखर आजरी व ऋग्वेद आजरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कणेरी मठाचे पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी व डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी अकरा वाजता इको व्हॅलीचे उद्घाटन समारंभ आहे. इको व्हॅली विषयी माहिती सांगताना शेखर आजरी म्हणाले, "गगनबावडामध्ये निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील दाट जंगलामध्ये औषधी वनस्पती विपुल प्रमाणात आहेत. येथील दहा एकर परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ऍग्रो टुरिझम सेंटर उभारले आहे. इको फ्रेंडली संकल्पन वर आधारित हे सेंटर असणार आहे. या ठिकाणी पंधरा साहसी प्रकारांचे खेळांचा आनंद लुटता येईल. कणेरी मठाच्या सहयोगाने येथील दुर्गम भागामध्ये शेतीचे उत्पन्न कसे वाढेल शेतकऱ्यांचा विकास कसा होईल या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. ऍग्रो टुरिझम सेंटरच्या माध्यमातून नैसर्गिक औषधी घटकांचा वापर केला जाईल. या ठिकाणी निसर्गातील वेगळा अनुभव पर्यटकांना घेता येईल. पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे. या परिसरात पूर्णता निसर्ग संवर्धनाला प्राधान्य राहील. शिवाय महिन्यातून एक वेळ अनाथआश्रमातील व दिव्यांग मुलांची येथे सफर घडविण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला अमर गांधी, डॉ. संदीप पाटील. अशोक रोकडे. पी.एस. जाधव उपस्थित होते