+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustवस्ताद बाबूराव चव्हाण यांचे निधन adjustकागल-पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी-धैर्यशील माने adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार
1000926502
1000854315
schedule03 Apr 24 person by visibility 475 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाचे ज्येष्ठ विश्वस्त व मेनन उद्योग क्षेत्राचे सचिन मेनन यांची शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या चेअरमनपदी राज्यपालांच्याकडून नियुक्ती झाली आहे. या निमित्ताने केआयटी परिवारातर्फे मेनन यांचा सत्कार करण्यात आला. 
  केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी प्रास्ताविक केले.  सचिन मेनन यांची राज्यपालांनी केलेली निवड ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवडीबद्दल त्यांनी राज्यपाल  रमेश बैस व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे आभार व्यक्त केले. नवीन शैक्षणिक धोरण ,विद्यार्थ्यांच्या व उद्योग क्षेत्राच्या अशा अपेक्षा यांची उत्तम सांगड घालण्यात श्री सचिन मेनन नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 संस्थेचे उपाध्यक्ष  साजिद हुदली यांनी  सचिन मेनन यांचे कार्यकर्तृत्व, स्वभाव, सामाजिक तसेच तांत्रिक क्षेत्रातील योगदान,आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग जगताबरोबर असलेले त्यांचे संबंध या विषयावर प्रकाशझोत टाकला. केआयटीच्या विकासात मेनन यांचे योगदान हे अत्यंत मोलाचे असल्याच्या भावना  हुदली यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केल्या. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता  सचिन मेनन यांनी सातत्याने जे काम करत आले आहेत त्या कामाचा सन्मान या नवीन जबाबदारीच्या रूपात त्यांना मिळाला असल्याचे गौरवपूर्ण उद्गार संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी काढले.
  सत्काराला उत्तर देताना  सचिन मेनन यांनी सातत्याने पुढे चालत राहिले पाहिजे, प्रयत्न करत राहिले पाहिजे ‘लक’ हा फॅक्टर तुमच्याकडे आपोआप येतोच या शब्दात .आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण आत्ता कुठे आहोत ? कुठे जायचे आहे ? कुठल्या मार्गाने जायचे ? आहे हे जर निश्चित असेल तर कोणत्याही प्रकारची स्वप्न आपण सहजगत्या आपल्या आवाक्यात आणू शकतो हे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त भरत पाटील,  दिलीप जोशी, आय.एम.ई.आर.चे संचालक डॉ.खाडिलकर , रजिस्ट्रार  मनोज मुजुमदार  उपस्थित होते. प्रा.क्षितिजा ताशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ अमित सरकार यांनी आभार केले.