Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !डिबेंचर्सच्या रकमेबाबत दूध संस्थांना अपेक्षित निर्णय होईल – हसन मुश्रीफकलाकार आहेत म्हणून समाज आहे- प्रकुलगुरू ज्योती जाधवभैया मानेंना काँग्रेसचाच पर्याय,  महायुतीच्या भांडणात उमेदवारीच्या लॉटरीची शक्यता कमी - सतेज पाटीलप्रा.. शशिकला सरगर यांना महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदानताराराणी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन, सासने मैदान येथे महोत्सव गोकुळकडून आईस्क्रीम निर्मिती, विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध ! रविवारी शुभारंभ!!

जाहिरात

 

 किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम 

schedule16 Mar 26 person by visibility 5 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘ताजी फळे, पालेभाज्या, संतुलित आहार, नियमित व्यायाम, नियमित शारीरिक तपासण्या या गोष्टींकडे लक्ष दिल्यास आरोग्य चांगले राहते . प्रत्येकाने आपल्या बॉडी मास इंडेक्सकडे लक्ष दिले पाहिजे . आपला बॉडी मास इंडेक्स १८.५ ते २४.९ च्या दरम्यान असावा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हाच सुखी जीवनाचा पाया आहे’  असे मत कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव व प्रख्यात मूत्ररोगतज्ज्ञ डॉ .विश्वनाथ मगदूम यांनी व्यक्त केले .

कौन्सिल ऑफ एज्युकेशन, पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि मगदूम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय किडनी दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉ मगदूम यांनी ‘निरोगी किडनीसाठी योग्य जीवनशैली आणि काळजी’  या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.

किडनीचे मानवी शरीरातील महत्त्व व कार्य याविषयी जनजागृती होण्यासाठी आणि किडनीच्या आरोग्याविषयी सजगता निर्माण  होण्यासाठी १२ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय किडनी दिवस म्हणून साजरा केला जाते.‘सर्वांसाठी मूत्रपिंडाचे आरोग्य व पर्यावरण संरक्षण ‘ हे सूत्र घेऊन यावर्षी जागतिक किडनी दिवस साजरा करण्यात आला .यानिमित्ताने पार्वती कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली व किडनीच्या आरोग्याविषयी प्रबोधन केले. डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्य डॉ  वर्षा मैंदर्गी, नाइट कॉलेजचे प्राचार्य डॉ उत्तम पाटील, नर्सिंग कॉलेजचे प्रा. भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य चिदानंद पाटील यांनी प्रास्ताविक केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes