Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ! विविध सामाजिक उपक्रम, गर्दीचा महापूर! !कोल्हापुरातील ब्राह्मण शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद ! पुरस्कार वितरण, तज्ज्ञांची व्याख्याने ! !णण तयकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव- बसव जयंती कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजनपंजाबराव डख म्हणाले, १९ ते २६ एप्रिल या कालावधीत पाऊस अन् गारपीठ…कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका- कोल्हापूर फर्स्ट एकत्र काम करणारवडणग्याचं पोरगं : आत्मकथनातून उलगडला संघर्ष-समाजभान-मूल्यनिष्ठेचा प्रवासकोल्हापूरच्या मातीने मला संस्कार दिले, पुरस्काराने मातीचे ऋण फेडण्याची जाणीव - गायिका श्रृती सडोलीकर - काटकरआमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रमरामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगी

जाहिरात

 

कोल्हापुरातील ब्राह्मण शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद ! पुरस्कार वितरण, तज्ज्ञांची व्याख्याने ! !

schedule12 Apr 26 person by visibility 85 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘सध्याचे महायुतीचे सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी निर्णय घेत आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या मंडळामार्फत फक्त ब्राह्मण नव्हे तर सर्व स्तरातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळतो आहे.’ असे प्रतिपादन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ब्राह्मण शेतकरी मेळावा, शेतकऱ्यांचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. ताराबाई पार्क येथील मांगल्य कार्यालयात रविवारी हा कार्यक्रम झाला. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कराड येथील सुभाष जोशी यांना सहकार भूषण पुरस्कार, भिलवडी येथील गिरीश चितळे व विटा येथील जयंत बर्वे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच भुदरगड तालुक्यात दारवाड येथील छाया श्रीकृष्ण कुलकर्णी, तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील मंजुषा माधव कुलकर्णी, सातारा जिल्ह्यातील भादे येथील सुनीती सुरेंद्र धायगुडे, पन्हाळा तालुक्यातील दिघवडे येथील स्मिता सचिन कुलकर्णी, कोल्हापुरातील विद्या भरत ठकार,  शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील ऋतुजा हृदयनाथ देशपांडे, हेमांगी हरिहर देशपांडे,  निपाणी तालुक्यातील बेडकीहाळ येथील श्रीया मुकुंद इनामदार, वाळवा तालुक्यातील शिरपूर येथील वरदा श्रीकृष्ण हसबनीस तर माढा तालुक्यातील उंदरगाव येथील विद्या श्रीपाद कुलकर्णी या महिला शेतकऱ्यांचा सन्मान झाला. 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणाले, शेतकऱ्याने प्रगतशील बनणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात वातावरण आणि निसर्ग यांचा समतोल बिघडलेला आहे याचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी आपली शेती करणे आवश्यक आहे. चितळे उद्योग समहाचे संचालक गिरीश चितळे म्हणाले, ‘ शेतकरी जोपर्यंत स्वतः पिकवलेला माल स्वतः विकत नाही. म्हणजे विपणन व्यवस्था चांगली करत नाही. तोपर्यंत त्याचा आर्थिक स्तर उंचावणार नाही.’नाबार्ड मधील विविध योजनांची माहिती आर.एस.चौगले आणि द पॉली फॉस्फेट तंत्रज्ञानावर जयदेव बर्वें यांनी दिली. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी यांनी प्रास्ताविक केले. शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे, विवेक जोशी,गुरुप्रसाद कुलकर्णी, प्रमोदिनी हर्डीकर, सचिन कुलकर्णी, जिवन कुलकर्णी,सचिन पितांबरे, उदय गोसावी, के.रामाराव, सचिन जिल्हेधार आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes